scorecardresearch

Premium

नवजोतसिंग सिद्धूंचा काँग्रेसला घरचा आहेर; ‘आप’चं कौतुक करताना म्हणाले, “पंजाबमध्ये माफियाविरोधी पर्व…!”

सिद्धू म्हणतात, “मान यांच्यावर प्रचंड अपेक्षांचा डोंगर आहे, ते पंजाबला पुन्हा चांगले दिवस दाखवतील ही आशा आहे”

navjot singh siddhu targets congress
नवज्योत सिंग सिद्धूंचा काँग्रेसला घरचा आहेर!

पंजाबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे भाजपाला देखील नाकारून पंजाबच्या मतदारांनी आम आदमी पक्षाच्या पारड्यात आपला कौल दिला. भगवंत मान पंजाबचे नवे मुख्यमंत्री झाले. पण गेल्या सहा महिन्यांपासून पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वाद अद्याप शमण्याचं चिन्ह दिसत नाहीयेत. या सगळ्याच्या केंद्रस्थानी असणारे काँग्रेस नेते नवजोतसिंग सिद्धू यांनी आधी आपला निवडून दिल्याबद्दल पंजाबच्या लोकांचं अभिनंदन केल्यानंतर आता भगवंत मान यांना शुभेच्छा देताना पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. निकालांनंतर नवजोतसिंग सिद्धू यांनी याआधीच पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

पंजाबच्या जनतेचे आभार!

नवजोतसिंग सिद्धू यांनी निकालांनंतर प्रतिक्रिया देताना पंजाबच्या लोकांचं अभिनंदन केलं होतं. “आम आदमी पक्षाला मत देऊन पंजाबच्या लोकांनी उत्तम निर्णय घेतला आहे. लोकांचा आवाज हा देवाचा आवाज असतो. आपण त्याचा नम्रपणे स्वीकार करायला हवा”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

sushma andhare
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांंच्या समोर लढणे आम्हाला मोठे आव्हान वाटतच नाही; उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे मत
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”
Narendra Modi in convection
“काँग्रेसमध्ये दोन गट, पक्ष हताश झाल्याने…”, मोदींची टीका; म्हणाले, “देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी…”
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : पक्षविस्तार नव्हे पक्षबुडीचा संकेत

आता काँग्रेसलाच दिली ‘माफिया’ची उपमा?

दरम्यान, आज नवजोतसिंग सिद्धू यांनी केलेल्या सूचक ट्वीटमध्ये भगवंत मान यांना शुभेच्छा देताना त्यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. “सर्वात आनंदी व्यक्ती तो असतो, ज्याच्याकडून कुणीही काही अपेक्षा ठेवत नाही. भगवंत मान यांनी पंजाबमध्ये माफियाविरोधी पर्वाचा झेंडा फडकावला आहे. त्यांच्यावर अपेक्षांचा डोंगर आहे. ते या अपेक्षा पूर्ण करतील आणि पंजाबला पुन्हा एकदा चांगले दिवस दाखवतील, लोकाभिमुख धोरणं राबवतील अशी आशा आहे”, असं सिद्धू म्हणाले आहेत.

“सिद्धूने तर काम चोख केलं, आता नाना…”, भाजपाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना खोचक टोला!

निवडणुकांच्या आधी सहा महिन्यांपासून पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला होता. नवजोतसिंग सिद्धू यांचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत तीव्र मतभेद झाले होते. अमरिंदर सिंग यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या चरणजीतसिंग चन्नी यांच्याशी देखील सिद्धूंचे मतभेद होते. पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी करून हे मतभेद मिटवले होते. मात्र, निवडणुकांमध्ये काँग्रेसला या अंतर्गत कलहाचा फटका बसल्याचं आता बोललं जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navjot singh siddhu targets punjab congress congratulating bhagwant mann aap pmw

First published on: 17-03-2022 at 13:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×