पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू ३३ वर्षे जुन्या ‘रोड रेज’ प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगत आहेत. दरम्यान सिद्धू यांची तब्येत बिघडली असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पटियाळा येथील राजेंद्र रुग्णालयात नेण्यात आले आहे. तुरुंगातील पोळी-भाजी खाण्यास सिद्धू यांनी नकार दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


सिद्धूंकडून विशेष आहाराची मागणी
सिद्धूंना गव्हाची ऍलर्जी आहे. त्यांना यकृताचा त्रास आहे. हे पाहता सिद्धूंनी तुरुंग प्रशासनाकडे विशेष आहाराची मागणी केली आहे. त्यानंतर तुरुंग प्रशासनाकडून त्यांना उकडलेल्या भाज्या आणि कोशिंबीर देण्यात येत होते. आज सिद्धूंनी आपल्या प्रकृतीबाबत तुरुंग प्रशासनाकडे चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिद्धूंचा त्रास पाहता तुरुंगात एक वैद्यकीय मंडळ तयार करण्यात आले आहे, जे लवकरच सिद्धूच्या आहाराबाबत निर्णय घेईल.


एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
१९८८ च्या ‘रोड रेज’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नवज्योत सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली होतीपार्किंगवरून झालेल्या वादात सिंद्धूंनी एका ६५ वर्षीय व्यक्तीसोबत हातापाई केली होती. या हातापाईत त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता.. त्यावेळी सिद्धूचे वय सुमारे २५ वर्षे होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी सिद्धूला केवळ एक हजार रुपयांचा दंड ठोठावून मुक्त केले होते. याविरोधात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली होती, ती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आणि सिद्धूला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

तुरुंगातील सुरक्षेवरून गोंधळ
रोड रेज प्रकरणात सिद्धूसोबत आरोपी असलेल्या रुपिंदर सिंग संधूने रविवारी कारागृहातील सुरक्षेबाबत प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले. सिद्धू हे आगामी काळात पंजाबचे भविष्य असल्याचे ते म्हणाले. कारागृहात प्रोटोकॉल पाळला जात आहे की नाही, याची तपासणी व्हायला हवी. काँग्रेस नेते हरदयाल कंबोज म्हणाले की, सिद्धू तुरुंगात गेल्यानंतर ज्यांनी त्यांची भेट घेतली त्या सर्व लोकांची चौकशी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली पाहिजे आणि त्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे.


सिद्धूच्या सुरक्षेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तुरुंग अधिकारी मनजीत तिवाना म्हणाले की, कैद्यांना सुरक्षित ठेवताना सर्व नियमांचे पालन केले जात आहे. सिद्धू यांच्या बॅरेकमध्ये कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेश देण्यात आलेला नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navjot singh sidhu health deteriorated in jail police took him to the hospital dpj
First published on: 23-05-2022 at 14:03 IST