छत्तीसगडमध्ये नक्षलवादी शरण

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्य़ात मंगळवारी एका २२ वर्षीय नक्षलवाद्याने शरणागती पत्करली.

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्य़ात मंगळवारी एका २२ वर्षीय नक्षलवाद्याने शरणागती पत्करली. त्याला पकडण्यासाठी एक लाख रुपयांचे इनाम जारी करण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. सदर नक्षलवाद्याचे नाव हरीश मांडावी असे असून तो मलनगीर एलजीएस गटाचा आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलिसांसमोर त्याने शरणागती पत्करली, असे दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक कामलोचन कश्यप यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Naxalite surrender in chhattisgar