scorecardresearch

Premium

नक्षलवाद्यांचे ‘हमास’ला समर्थन, छत्तीसगड सीमेवर फलक

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धात  ‘हमास’ या अतिरेकी संघटनेला नक्षलवाद्यांनी समर्थन दिले आहे.

Naxalites support Hamas placards on Chhattisgarh border
नक्षलवाद्यांचे ‘हमास’ला समर्थन, छत्तीसगड सीमेवर फलक

गडचिरोली : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धात  ‘हमास’ या अतिरेकी संघटनेला नक्षलवाद्यांनी समर्थन दिले आहे. ही संघटना पॅलेस्टाईन जनतेसाठी संघर्ष करीत आहे, असा उल्लेख करून नक्षलवाद्यांनी छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील प्रतापपूर जंगल परिसरात फलक लावले आहेत.

२ ते ८ डिसेंबरदरम्यान नक्षलवाद्यांकडून ‘पीएलजीए’ सप्ताह पाळला जातो. यादरम्यान नक्षलप्रभावित क्षेत्रात ते हिंसक कारवाया करतात. या पार्श्वभूमीवर  गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडमधील जंगल परिसरात गुरुवारी नक्षलवाद्यांनी दोन फलक लावले. यात त्यांनी इस्रायलचा विरोध केला असून   ‘हमास’ या अतिरेकी संघटनेला समर्थन दिले आहे. हमास ही दहशतवादी संघटना नसून  पॅलेस्टाईनमधील जनतेच्या मुक्तीसाठी संघर्ष करीत आहे. त्यामुळे पॅलेस्टाईनला समर्थन देऊन त्यांचे हात मजबूत करा, असे आवाहन नक्षल्यांनी केले आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी काही भाजप समर्थकांची हत्या केली होती. त्यानंतर शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यात देखील लागोपाठ तिघांची केली. त्यामुळे ‘पीएलजीए’ सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात दहशतीचे वातावरण आहे.

pimpri chinchwad marathi news, ncp both factions aggressive in pimpri chinchwad marathi news, rohit pawar sunil tatkare marathi news
पिंपरी-चिंचवडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आक्रमक
Underworld don Ameer Balaj Tipu
लग्नाची पार्टी, धाड धाड गोळ्यांचा अक्षरशः पाऊस आणि डॉन आमीर ट्रकांवालाची हत्या, जाणून घ्या इनसाईड स्टोरी
Valery Zaluzhny
युक्रेनच्या लष्करप्रमुखांनी राजीनामा का दिला? अध्यक्षांबरोबर मतभेदांचा परिणाम? की युद्ध रेंगाळल्याचा फटका?
Iran
अमेरिकेचे इराणला जोरदार प्रत्युत्तर, इराक-सीरियाला केले लक्ष्य; हवाई हल्ल्यात १८ दहशतवादी ठार!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Naxalites support hamas placards on chhattisgarh border amy

First published on: 01-12-2023 at 05:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×