मौलश्री सेठ, इंडियन एक्स्प्रेस

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर मात्र तरीही शहराच्या गजबजाटापासून दूर बांधकाम सुरू असलेले एक मोठे लांबलचक सभागृह. या सभागृहात राम मंदिरासाठी २१ तरुण अर्चकांचे मंत्रोच्चार, वेगवेगळे धार्मिक विधी यांचे कठोर प्रशिक्षण सुरू आहे.अयोध्येतील कडाक्याच्या थंडीत पहाटे चार वाजल्यापासून या २१ तरुणांना  मंत्रोच्चार, वेगवेगळे धार्मिक विधी यांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी त्यांना पहाटे ३ वाजता उठून तयार राहावे लागते. त्यानंतर ४ वाजल्यापासून त्यांचे मंत्रोच्चार, शास्त्राचे वेदांचे, ज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास आणि योगाभ्यास यांचे प्रशिक्षण सुरू होते. सुरुवातीला योगासने आणि व्यायाम केल्यानंतर सकाळी ७ वाजल्यापासून दुपापर्यंत त्यांचे इतर प्रशिक्षण सुरू असते. दुपारच्या लहानशा विश्रांतीनंतर पुन्हा प्रशिक्षण..

The 17-year-old boy who was behind the wheels when the accident happened was produced before a magistrate
दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याचे न्यायालयाचे आदेश, जामीन मंजूर
mumbai property tax marathi news
मुंबई: करबुडव्यांच्या २४ मालमत्तांवर जप्ती, शुभदा गृहनिर्माण संस्थेला ३५.९४ कोटींचा कर भरण्यासाठी ४८ तासांची मुदत
alcohol case, Malvani, four accused,
मालवणी येथील २०१५ सालचे दारूकांड : दोषसिद्ध चार आरोपींना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Madhavi Latha
भाजपाच्या उमेदवाराने तपासले मुस्लिम महिला मतदारांचे ओळखपत्र, बुरखा वर करत म्हणाल्या…
Crime News
गोळ्या झाडून आईची हत्या, हातोड्याचे वार करुन पत्नीला संपवलं, मुलांना छतावरुन फेकल्यानंतर तरुणाची आत्महत्या
hamid mukta dabholkar 9
उच्च न्यायालयात जाण्याचा दाभोलकर कुटुंबीयांचा निर्णय; मख्य सूत्रधाराला शोधण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याने नाराजी
Nagpur, Auto, Auto rickshaw drivers association,
नागपूर : ‘त्या’ ऑटो चालकाविरुद्ध ऑटोरिक्षा चालक संघटना सरसावली
Nagpur Central Jail, Inmates Meet Their Children, Inmates Meet Their Parents, Heartwarming Gathering Program, Nagpur Central Jail Inmates Meet Children, police, inmates, Nagpur news, marathi news,
रुसवे, फुगवे अन गोडवे! कारागृहातील कैद्यांनी घेतली मुलांची गळाभेट

हेही वाचा >>> प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी; सरकारचा निर्णय

कठोर दिनचर्येचे आचरण करणारे हे बहुतांश तरुण उत्तर प्रदेश आणि येथील आहेत. त्यांची अर्चक होण्यासाठीची निवडही अतिशय खडतर चाचण्यांमधून करण्यात आली आहे. अर्चक होण्यासाठी २७०० अर्ज आले होते. त्यासाठी वयोमर्यादा ३० वर्षे ठेवण्यात आली होती. त्यातून ३०० जणांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती, अशी माहिती या अर्चकांचे प्रशिक्षण असणारे आचार्य मिथिलेश नंदिनी शरण यांनी दिली.

निवडलेल्या तरुणांचे आचरण, समर्पण आणि पार्श्वभूमीची तपासणी केल्यानंतर त्यातील २३ तरुणांची निवड करण्यात आली. त्यातील दोघे यापूर्वीच राम लल्ला मूर्तीसाठी काम करणाऱ्या कुटुंबातील असल्याने त्यांना वगळण्यात आले. या अर्चकांना अतिशय कठोर दिनचर्येचे आचरण करावे लागणार आहे. त्यांना मूर्तीच्या ष्टद्धr(२२४)ृंगारासाठी वरिष्ठ अर्चकांबरोबरीने दोन ते अडीच तास उभे राहावे लागणार आहे. त्यासाठी तसेच प्रथा पालनासाठी त्यांना शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक आरोग्यही उत्तम राखावे लागणार आहे, असे आचार्य शरण यांनी सांगितले. निवडलेले सर्व तरुणांनी वेगवेगळय़ा गुरुकुलमधून प्रशिक्षण घेतले आहेच, मात्र त्यांचे उच्चार वेगवेगळे असल्याने त्यांना त्याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. या तरुणांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत प्रत्येक महिन्याला २ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. त्यांचे प्रशिक्षण मे महिन्यात पूर्ण होणार आहे.