निवडणूक आयुक्तपदी अरुण गोयल यांच्या नियुक्ती प्रक्रियेची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला दिले. गोयल यांची नियुक्ती घाईघाईने झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केल्यानंतर गुरुवारीच कागदपत्रे सादर करण्यास न्यायालयाने सांगितले. याच सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सशक्त चारित्र्याच्या व्यक्तीची नियुक्ती केली पाहिजे. निवडणूक आयुक्त इतके स्वतंत्र आणि निःपक्षपाती असावेत की पंतप्रधानांविरोधात तक्रार आली आणि कारवाई करावी लागली तरी त्यांनी मागेपुढे पाहू नये, अशा अर्थाचं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनावणी सुरु असताना नियुक्तीवर आक्षेप
निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी ‘न्यायवृंदा’सारखी (कॉलेजियम) पद्धत असावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर न्या. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. पाच न्यायाधीशांच्या या घटनापीठामध्ये न्या. अजय रस्तोगी, न्या. अनिरुद्ध बोस, न्या. हृषीकेश रॉय आणि न्या. सी. टी. रवीकुमार यांचाही समावेश आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने काही मुद्दे उपस्थित केले. याचिकाकर्ते अरूप बारनवाल यांचे वकील अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी बुधवारी गोयल यांच्या नियुक्तीचा मुद्दा उपस्थित केला. ‘‘न्यायालयाने सुनावणी सुरू केल्यानंतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली. गुरुवापर्यंत गोयल सचिव स्तरावरील अधिकारी म्हणून सरकारमध्ये काम करीत होते. अचानक शुक्रवारी त्यांना स्वेच्छानिवृत्ती देऊन निवडणूक आयुक्तपदी नियुक्त केले गेले,’’ असे भूषण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need election commissioner who can take on even the prime minister if needed supreme court scsg
First published on: 24-11-2022 at 07:38 IST