“लोकांच्या मनातील पोलिसांची नकारात्मक प्रतिमा बदलणं हे मोठं आव्हान”, मोदींचा IPS प्रशिक्षणार्थींना कानमंत्र!

राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम हे तुमच्या प्रत्येक कृतीतून नेहमी प्रतिबिंबत व्हायला हवं, असंही म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज भारतीय पोलीस सेवा(आयपीएस) प्रशिक्षणार्थींनी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की, लोकांची पोलिसांबद्दल असलेली नकारात्मक धारणा हे एक मोठं आव्हान आहे आणि ही प्रतिमा बदलण्यासाठी प्रशिक्षणार्थींनी काम करणे आवश्यक आहे.

सररदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमधील आयपीएस प्रशिक्षणार्थींशी ऑनलाईन संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, , “आमचे पोलीस कर्मचारी देशाच्या सुरक्षेसाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि दहशतवादाशी लढण्यासाठी आपले प्राणही अर्पण करतात. ते कित्येक दिवस घरी जाऊ शकत नाहीत, सणांच्या वेळीही ते घरी जाऊ शकत नाहीत परंतु जेव्हा पोलिसांच्या प्रतिमेचा प्रश्न येतो तेव्हा लोकांची धारणा वेगळी असते.”

“सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलची नकारात्मक धारणा हे एक मोठे आव्हान आहे. कोविडच्या सुरुवातीला, ही धारणा थोडी बदलली होती कारण पोलीस गरीब आणि गरजूंना मदत करत होते. तथापि, धारणा पुन्हा नकारात्मक झाली आहे. ” असं म्हणत, पोलीस दलात येणाऱ्या नव्या पिढीची ही प्रतिमा बदलण्याची जबाबदारी असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना पुढे म्हणाले की, राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम हे तुमच्या प्रत्येक कृतीतून नेहमी प्रतिबिंबत व्हायला हवं. कामगिरीवर असताना राष्ट्रहीत कायम डोक्यात ठेवूनच निर्णय घ्यायला हवेत. तुम्ही हे कायम लक्षात ठेवायला हवं की तुम्ही एक भारत, श्रेष्ठ भारताचे ध्वजवाहक आहात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Negative perception that people have of police is a big challenge narendra modi msr