काठमांडू, बीजिंग : नेपाळमध्ये महापूर आल्याच्या घटनेला एक आठवडा झाल्यानंतर आता चर्चेचा रोख पुराचे मूळ कारण शोधण्यावर केंद्रित होत आहे. पूरसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बालेन शहा यांच्यासह विविध तज्ज्ञ पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. या पुराचा हवामान बदलाशी असलेला संबंध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठोसपणे मांडला पाहिजे, असे शहा बुधवारी म्हणाले. दरम्यान, पूरबळींची संख्या १,२४३ इतकी झाली आहे.
संसदेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह’ला संबोधित करताना शहा यांनी सांगितले की, ‘‘या आपत्तीची व्याप्ती आणि स्वरूप यामुळे हवामान बदलामुळे हिमालय क्षेत्रात राहणार्या लोकांना वाढत जाणार्या धोक्यासंबंधी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.’’ ते म्हणाले, ‘‘तज्ज्ञांच्या मते, हिमनदीचा कडा कोसळणे हे रसुवा जिल्ह्यतील भोटेकोशी येथे अचानक पूर येण्याचे कारण होते. यारून पर्वत भागातील लोकांना वाढत्या प्रमाणात हवामान बदलाचे परिणाम सहन करावे लागत असल्याचे दिसत आहे.’’
पुरामध्ये बेपत्ता लोकांची संख्या दिवसागणिक वाढत असून आता हा आकडा पाच हजारांच्या जवळ गेल्याचे पोलिसांनी सांगितले. बेपत्ता लोक जिवंत सापडण्याची आशा मावळत आहे, असे नेपाळच्या ‘नॅशनल इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’चे वरिष्ठ अधिकारी फणींद्र पौडेल यांनी सांगितले. अधिकार्यांनी सांगितले की, पूरबळींची संख्या १,२४३ झाली असून ४,८७५ जण बेपत्ता आहेत. ११,९८३ जणांची सुटका केली गेली आहे.
पूरग्रस्त भागात शोध व बचाव कार्य, मदतसामग्रीचे वितरण आणि सापडलेल्या मृतदेहांचे व्यवस्थापन या कामासाठी ७,९१२ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याबरोबरच लोकांना अति-धोक्याच्या भागांतून सुरक्षित ठिकाणी हलवणे, ढिगारे हटवून रस्ते मोकळे करणे, तसेच शोध, बचाव व मदतकार्यासाठी स्थानिक अधिकारी व रहिवाशांशी समन्वय साधणे ही कामेदेखील पोलीस पथके करत आहेत.
कर्मचारी सुखरूप असण्याची आशा
जलविद्युत प्रकल्पांमध्ये अडकलेले शेकडो कर्मचारी सुखरूप असतील अशी आशा अधिकार्यांना वाटत आहे. या प्रकल्पांमध्ये कर्मचार्यांना राहण्यासाठी जागा आणि खोल्या आहेत, त्यांना तिथे अन्न आणि पाणीही उपलब्ध आहे. त्यामुळे ते जिवंत असतील, असे नेपाळ इले्ट्रिरसिटी ऑथॉरिटीच्या मंडळाचे सदस्य आमशू किरण शाही यांनी सांगितले.
हे संकट हवामान बदलाशी संबंधित आहे, ही वस्तुस्थिती आपण आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठामपणे मांडली पाहिजे. हवामान बदलाला े्नसर्व देश कारणीभूत आहेत, त्याचे परिणाम हाताळण्याची व ते कमी करण्याची जबाबदारीही जागतिक समुदायावरच आहे. – बालेन शहा, पंतप्रधान, नेपाळ नद्या, पर्वतांमध्ये आपल्या इच्छेप्रमाणे बदल करता येतील, ही गेल्या अनेक दशकांपासूनची धारणा असलेली अभियांत्रिकी मानसिकता नेपाळमधील भीषण पुराला कारणीभूत आहे. आपल्याला आज जे काही दिसत आहे तो निसर्गाने उगवलेला सूड आहे. – सुनीता नारायण, पर्यावरणतज्ज्ञ
