नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली असून हेलिकॉप्टरमध्ये ६ प्रवासी आणि १ वैमानिक असे सात जण होते. हेलिकॉप्टर काठमांडूपासून ८० किलोमीटर अंतरावर कोसळले असून पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. सरकारी यंत्रणांनी प्रवाशांबाबत कोणतीही माहिती दिलेला नाही.
‘ऑल्टिट्यूड एअर’ या कंपनीचे हेलिकॉप्टर एका रुग्णाला आणण्यासाठी समगौन येथे गेले होते. मात्र, उड्डाणाच्या काही वेळाने हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. दुपारी हेलिकॉप्टर सापडले असून हेलिकॉप्टर नुवाकोट जिल्ह्यातील दुर्गम भागात कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये एक वैमानिक व सहा प्रवासी होते. निश्चल के सी हे वैमानिक असून पाच नेपाळी आणि एक जपानचा नागरिक असे सात जण हेलिकॉप्टरमध्ये होते. या प्रवाशी बचावले की त्यांचा या घटनेत मृत्यू झाला, याबाबत कोणतीही मिळू शकलेली नाही. पाऊस आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नेपाळचे सैन्य आणि अन्य पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत. हेलिकॉप्टर कोसळले असले तरी अद्याप हेलिकॉप्टरने पेट घेतलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
Missing chopper is spotted in place called Satyawati inside a dense forest. Crash site lies at an altitude of 5500 feet & rescue operation is being attempted,but adverse weather is hindering operation:Nepal Civil Aviation Authority on chopper with 7 people aboard crashes in Nepal
— ANI (@ANI) September 8, 2018