scorecardresearch

Premium

नेपाळ विमान दुर्घटना : ‘सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला असावा,’ नेपाळ गृहमंत्रालयाचा अंदाज; आतापर्यंत १४ प्रवाशांचे मृतदेह सापडले

नेपाळमधील या विमान दुर्घटनेत चार भारतीयांचा समावेश आहे. हे भारतीय मूळचे ठाण्याचे असून यामध्ये अशोक कुमार त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर हे विभक्त दाम्पत्य तसेच धनुष आणि रितिका या त्यांच्या मुलांचा समावेश आहे.

nepal airplane crash
नेपाळ विमान दुर्घटना (फोटो- एएनआय)

नेपाळमध्ये रविवारी कोसळलेल्या तारा एअरलाइन्सच्या विमानाचे अवशेष सापडल्यानंतर आता या विमानातून प्रवास करत असलेल्या १४ प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत. अजूनही बाकीच्या प्रवाशांचा शोध घेतला जात असून जपानच्या गृहमंत्रालयाने सर्व २२ प्रवाशांचा मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>> सिद्धू मुसेवाला यांच्या आईची संतप्त प्रतिक्रिया, मुलाच्या हत्येला पंजाब सरकार जबाबदार असल्याचा आरोप

canada plane crash, vasai youth killed in canada plane crash, 25 year old boy from vasai died in plane crash
कॅनडातील विमान अपघातात वसईच्या तरुणाचा मृत्यू
PMP cashless ticket service
पुणे : पीएमपीची आता कॅशलेस तिकीट सुविधा; सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबणार
Explosion in Pakistan
पाकिस्तानात ईदच्या मिरवणुकीत आत्मघातकी स्फोट; ५२ जणांचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहांचा खच, VIDEO आला समोर
after flood queues of vehicles at servicing centers
उपराजधानीतील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये अचानक वाहनांच्या रांगा..!!

नेपाळमध्ये तारा एअरलाइनची फ्लाईट ९ एनएईटी पोखरा येथून जोमसोमला जात होती. रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हे विमान अचानक बेपत्ता झाले होते. या घटनेनंतर बचाव पथकाला या विमानाचे अवशेष सापडले होते. आता याविमानातील १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. रविवारी दिवसभर शोधमोहीम राबवल्यानंतर दुपारी ४ वाजता विमान कोसळल्याची पुष्टी करण्यात आली. या विमानात तीन क्रू मेंबर्ससह एकूण २२ जण होते. यामध्ये ४ प्रवासी भारतीय होते. तर जर्मनीचे २ आणि १३ प्रवाशी नेपाळ देशाचे होते. अपघातग्रस्त विमान ३० वर्षांहून अधिक जुनं असल्याची माहितीही समोर आली आहे.

हेही वाचा >>> नेपाळमधील अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले; अंगावर काटा आणणारे PHOTO आले समोर

“या विमानात प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याचा आम्हाला संशय आहे. आमच्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत सर्वांचाच मृत्यू झाला असावा, मात्र अजूनही अधिकृत माहिती येण्याची आम्ही वाट पाहत आहोत,” असे नेपाळ गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

हेही वाचा >>> Video : जगप्रसिद्ध मोनालिसा पेंटिंग धोक्यात! महिलेचा वेश धारण करत कलाकृतीला विद्रूप करण्याचा प्रयत्न

त्रिपाठी-बांदेकर कुटुंब विमानात प्रवास करत होते

नेपाळमधील या विमान दुर्घटनेत चार भारतीयांचा समावेश आहे. हे भारतीय मूळचे ठाण्याचे असून यामध्ये अशोक कुमार त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर हे विभक्त दाम्पत्य तसेच धनुष आणि रितिका या त्यांच्या मुलांचा समावेश आहे. अशोक कुमार आणि वैभवी हे विभक्त दाम्पत्य आपल्या मुलांना वर्षातून एकदा परदेश पर्यटनासाठी घेऊन जात असे. यंदा ते मुलांना घेऊन नेपाळला गेले होते. सध्या त्यांचादेखील शेध सुरु आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nepal plane crash all passengers on board have may lost their lives said nepal home ministry prd

First published on: 30-05-2022 at 14:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×