दिल्लीच्या चांदनी महल परिसरामध्ये ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्या घरात आढळून आल्यानंतर पोलिसांनी तिच्या पुतण्याला तिच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. मृत मुमताज परवीनला २००० साली स्पेशल सेलने तिच्या पतीसह, पाकिस्तानचा आयएसआयचा संशयित एजंट म्हणून अटक केली होती. तिचा पती पाकिस्तानात हद्दपार झाला असताना, ती भारतात राहिली आणि तिने नागरिकत्वासाठी अर्जही केला होता.

पोलिसांनी सांगितले की, महिलेला तिचा पुतण्या फरमान (२२) याने कथितरित्या ठार केले कारण तिला बारा हिंदू राव येथील दुहेरी खून प्रकरणात सामील असल्याचा संशय होता, जिथे जुलैमध्ये गोळीबारात दोन निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ३ सप्टेंबर रोजी, परवीनचा मृतदेह तिच्या शयनगृहात आढळल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले की तिच्या घरातून दुर्गंधी येत आहे. मानेवर खोल जखमांच्या खुणा असलेले, तिचे कुजलेले शरीर पोलिसांना सापडले.

परवीन एक विधवा होती आणि एकटी राहत होती, पोलिसांनी तिच्या दूरच्या कुटुंबातील सदस्याशी संपर्क साधल्याचे सांगितले. पोलिसांनी चांदणी महालमधील सीसीटीव्ही फुटेज चेक केले, तेव्हा एक संशयित सापडला. डीसीपी (सेंट्रल) जसमीत सिंग म्हणाले, “३० ऑगस्टला आणि घटनेच्या दिवशी रात्री ८ च्या सुमारास तो संशयित महिलेच्या घराजवळ दिसला. त्याचा चेहरा झाकलेला होता आणि फुटेजमध्ये तो रिक्षातून जात असल्याचं आढळून आलं. आम्ही कॉल रेकॉर्ड्सचे विश्लेषण केले आणि संशयितांवर पाळत ठेवली. कुटुंबातील सदस्यांचीही चौकशी करण्यात आली. ”

हेही वाचा – नागपूरहून घरी परतलेल्या तरुणाची चोर असल्याच्या संशयातून जमावानं केली हत्या

रविवारी सिंह यांच्या टीमला परवीनचा पुतण्या या प्रकरणात सहभागी असल्याचे आढळले आणि त्याला मेरठमधून अटक केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्हा कबूल केला आणि सांगितले की, जुलै महिन्यात बारा हिंदू राव येथील नर्सिंग होमच्या बाहेर दोन प्रवाशांच्या मृत्यूच्या संदर्भात परवीनने त्याला दुहेरी हत्या प्रकरणात दोषी ठरवले होते. आरोपींनी हाजी पीर आणि त्याचा पुतण्या नईम नावाच्या व्यावसायिकाला लक्ष्य केले असले, तरी गोळ्या नर्सिंग होमच्या आसपास फिरणाऱ्या दोन माणसांना लागल्या. शाहदरा येथील एका इमारतीवरुन बिल्डर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पीर आणि त्याच्या कुटुंबाला लक्ष्य केल्याचे आढळून आले.

अधिक चौकशीत उघड झाले की, नईमचे वडील, वाकील अहमद, परवीनचे मित्र होते आणि तिने अहमद आणि पोलिसांना कथितपणे गोळीबार प्रकरणात फरमानचा सहभाग असल्याचे सांगितले. फरमानला फक्त चौकशीसाठी बोलावण्यात आले असले तरी, तो आरोपांमुळे संतापला आणि त्याने बदला घेण्याचा निर्णय घेतला, असे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक संपत्तीवरून त्याचे आणि परवीनचे भांडणही झाले होते. त्याने तिला मारण्याचा बेत आखला आणि ३ सप्टेंबरला ती एकटी असताना तिच्या घरी गेला. त्याने तिच्यावर कथितपणे वार केले, तिच्या घराला कुलूप लावले आणि निघून गेला. पोलिसांनी सांगितले की, फरमान मेरठमध्ये कपड्यांचे दुकान चालवतो आणि पत्नी आणि पालकांसोबत राहतो.