scorecardresearch

Premium

Ness Wadia : ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांची शिक्षा

नेस वाडिया यांच्याकडे २५ ग्रॅम ड्रग्ज सापडले होते

Ness Wadia : ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांची शिक्षा

Ness Wadia : २८३ वर्ष जुन्या वाडिया ग्रुपचे वारसदार असणारे नेस वाडिया यांना ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी जपानमध्ये दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेस वाडिया यांना मार्च महिन्यात होक्काइडो आयर्लंडच्या एका विमानतळावरुन अटक करण्यात आली होती. त्यांच्याजवळ २५ ग्रॅम ड्रग्ज सापडले होते. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान ही शिक्षा पाच वर्षांसाठी सस्पेंड राहणार आहे. यादरम्यान जर नेस वाडिया जपानमध्ये इतर कोणतं बेकायदेशीर कृत्य करताना आढळले तर त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात येणार आहे.

स्थानिक ब्रॉडकास्टर एनएचकेने दिलेल्या वृत्तानुसार, स्निफर डॉगने दिलेल्या अलर्टनंतर विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी नेस वाडिया यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे २५ ग्रॅम ड्रग्ज आढळले होते.

Navajbai Tata first woman director of Tata Sons
टाटा सन्सच्या पहिल्या महिला संचालक, गरिबांना पैसे देण्याऐवजी दिला प्रशिक्षणानंतर रोजगार, कोण होत्या लेडी नवाजबाई टाटा?
Sanjay Raut on Manipu mention Narendra Modi
“मणिपूरची परिस्थिती भयंकर, विद्यार्थ्यांना गोळ्या झाडून…”; मोदींचं नाव घेत संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले…
Murder of students in Manipur
मणिपूरमध्ये दोन विद्यार्थ्यांची हत्या, फोटोंमुळे वास्तव समोर; शस्त्रधारी व्यक्तीही फोटोत
monu manesar arrested
VIDEO: दोन मुस्लीम युवकांच्या हत्येप्रकरणी मोनू मानेसरला अटक, साध्या वेशातील पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, नेस वाडिया यांना २० मार्चच्या आधी जपान पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर जामीनावर सुटून ते भारतात परतले होते. खासगी वापरासाठी आपण ड्रग्ज बाळगल्याची कबुली त्यांनी दिली होती. २०२२ मध्ये टोकियोत ऑलिम्पिक्स पार पडणार आहे. याशिवाय यावर्षी रग्बी वर्ल्ड कप पार पडणार आहे. या पार्श्वभुमीवर जपानमध्ये अंमली पदार्थ विरोधी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.

नेस वाडिया आयपीएल संघ किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक आहेत. बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाबोसत असलेल्या प्रेमसंबंधांमुळेही ते चर्चेत आले होते. २०१४ रोजी प्रिती झिंटाने नेस वाडिया यांच्याविरोधात छळ केल्याचा आरोप केला होता. पण नंतर तिने तक्रार मागे घेतली होती.

वाडिया देशातील श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. वाडिया समूहात बॉम्बे डाईंग, ब्रिटानिया, गो एअर विमान यांच्यासहित अन्य काही कंपन्यांचा समावेश असून वाडिया कुटुंबाची संपत्ती सातशे कोटी रुपयांच्या घरात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ness wadia found with drugs sentenced in japan

First published on: 30-04-2019 at 13:00 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×