नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिवस हा ‘देशभक्ती दिवस’ म्हणून घोषित करण्यात यावा, असे आवाहन नेताजींचे नातू आणि भाजपा नेते चंद्र कुमार बोस यांनी मोदी सरकारला केले आहे.

चंद्र कुमार बोस यांनी सांगितले की, बऱ्याच काळापासून ही मागणी करण्यात येत आहे की, नेताजींचा जन्मदिवस ‘देशभक्ती दिवस’ म्हणून घोषित केला जावा. त्यामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत मागणी केली आहे.

तसेच यंदा आपण महात्मा गांधीची १५० वी जयंती साजरी करीत आहोत. त्याप्रमाणे २०२० मध्ये २३ जानेवारी हा नेताजींचा जयंती दिवस ‘देशभक्ती दिवस’ किंवा ‘देशप्रेम दिवस’ म्हणून घोषित करायला हवा, असेही चंद्र कुमार बोस यांनी म्हटले आहे.