मंत्र्याच्या पतीचा चावा घेतल्याने ईस्राईल पंतप्रधानांच्या कुत्र्याला अटक

बेंजामिन नेतान्याहू यांच्या कुत्र्याने पाहुण्यांना चावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

कुत्र्याचे नाव काइया अाहे.

ईस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कुत्र्याने पाहुण्यांना चावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही बातमी स्वत: बेजामिन यांनी फेसबुकवरुन दिली आहे.
हन्नुकाह हा ज्यू नागरिकांचा सर्वात मोठा सण सुरु असताना ही घटना घडली. हन्नुकाह कार्यक्रमादरम्यान एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत कुत्र्याने शरीन हॉस्केल व कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचा चावा घेतला.
इस्त्रायलच्या आरोग्य नियमानुसार जरी कुत्र्याला सर्व डोस वेळच्यावेळी दिले असतील किंवा तुमच्याकडे कुत्र्याला घरात ठेवण्याचा परवाना असेल तरी देखिल चावा घेणा-या कुत्र्याला दहा दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागतो. कुत्र्याचे नाव काइया असून या वर्षी जुलैमध्ये प्राणी केंद्रातून बेंजामिन यांच्या मुलाने त्याला घरी आणले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Netanyahus dog sinks teeth into guests

ताज्या बातम्या