भारतीय वांशिकाचे उत्पादन
मोबाईलवर सेल्फी काढणे आता नवीन राहिलेले नाही, पूर्वीच्या काळी स्वत:चेच छायाचित्र स्वत: काढण्याची सोय नव्हती. कुणाला तरी विनंती करायला लागायची पण आता मोबाइलवर सेल्फी काढता येतो. त्यासाठी सेल्फी स्टिकही मिळते पण आता सेल्फी काढण्यासाठी एक मोबाईल अ‍ॅपही तयार करण्यात आले आहे. त्यामुळे आता संयुक्त सेल्फीही काढता येते मग तुमची ठिकाणे वेगळी असली तरी काही हरकत नाही.
नव्या अ‍ॅपचे नाव आहे पिकपाल. टेक्सासमधील भारतीय वांशिक महेश राजगोपालन यांच्या माईंडबी या कंपनीने ते तयार केले आहे. आयओएस व अँड्राइडवर ते मोफत उपलब्ध झाले आहे. या अ‍ॅपमुळे तुम्ही कुठेही असलात तरी सेल्फीसाठी एकत्र येऊ शकता व छायाचित्र काढू शकता, त्यात कोलाजही शक्य आहे. पिकपाल वापरकर्ते तीन मित्रांना एकत्र बोलावू शकतात. ज्यांना तुम्ही पिकपाल विनंती करीत आहात त्यांनी पंधरा मिनिटात तुम्हाला प्रतिसाद दिला पाहिजे तरच तुमचे सेल्फी शक्य आहे. त्यांनी तुम्हाला सेल्फी पाठवले की, तुम्ही ते जोडून स्वत: बरोबर सेल्फी काढल्याचे दाखवू शकता. ही सेल्फी छायाचित्रे संपादित करता येतात. अ‍ॅपमध्ये तशी साधने आहेत. पिकपालमध्ये सोशल मीडिया, वास्तव कोलाज व सेल्फी यांचा एकत्रित मिलाफ आहे. सोशल नेटवर्किंगने आपण आपले आयुष्य कसे चित्रबद्ध करतो यात फरक झाला आहे असे राजगोपालन सांगतात. त्यांच्या मते पिकपालमुळे तुम्ही छायाचित्रे एकमेकांना पाठवू शकता, लाइक करू शकता व एकमेकांशी संपर्कात राहू शकता. पिकपालमुळे तुम्ही जवळ असल्याचे दाखवता येते मग तुम्ही कुठेही असा. सर्व सेल्फींचा कोलाज यात शक्य आहे. ती छायाचित्रे पिकपाल गॅलरीत असतील. प्रत्येक कोलाज नंतर तुमच्या मित्रांबरोबर जोडता येईल तो फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हॉटसअ‍ॅपवर टाकता येईल.
फेसबुकच्या मदतीने तुम्ही मित्रांना एकत्र सेल्फीसाठी आमंत्रित करू शकता. मित्रांनी पिकपाल डाऊनलोड केले की, मूळ वापरकर्ता त्यांना जास्त कोलाजसाठी आमंत्रित करू शकतो. मूळ वापरकर्ता सेल्फी काढतो व एक दिवस बाकीच्यांशी संपर्क साधतो व त्यांचे सेल्फी मागतो. ही क्रिया संपल्यावर पिकपाल अ‍ॅप त्या छायाचित्रांचे आदानप्रदान करतो मग तुम्ही एकत्रित सेल्फी तयार करू शकता व नंतर फेसबुक व इन्स्टाग्रामवर टाकू शकता. सोशल नेटवर्किंगचा वापर सामाजिक आशय (सोशल कंटेट) तयार करण्यासाठी करता येतो हे यातून दिसते. जे सेल्फी सुरुवातीला वाईट दिसतात ते नंतर छान दिसतील असे संपादन यात करता येते. पण तुमच्या मित्रांनी वेळेत प्रतिसाद दिला नाही तर कोलाजची फ्रेम नाहीशी होते त्यासाठी पंधरा मिनिटे दिलेली असतात.