scorecardresearch

“संपूर्ण शरीर बुरख्याने झाका; डोळेही दिसता कामा नये”; अफगाणी महिलांसाठी तालिबानचा नवा आदेश

काही दिवसांपूर्वीच तालिबानने महिलांना वाहन परवाना देण्यावरही बंदी घातली आहे.

afghanistanTaliban Religious guideline tv channels stop airing shows with women actors
प्रातिनिधिक छायाचित्र (फोटो : reuters)

उपासमार आणि आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानने महिलांसाठी नवा आदेश जारी केला आहे. अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना डोक्यापासून पायापर्यंत बुरखा घालण्याचा आदेश देण्यात आला आहे. एवढंच नाही तर या बुरख्यातून महिलांचे डोळेही दिसता कामा नये, असे आदेशात म्हटले आहे.

“महिलांनी डोक्यापासून पायापर्यंत बुरखा घालणे आवश्यक आहे. कारण ते पारंपारिक आणि आदरणीय आहे,” असे तालिबान प्रमुख हिबतुल्ला अखुंदजादा यांनी म्हटले आहे. कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यापासून महिलांवर लादण्यात आलेल्या नियमांपैकी हा सर्वात कठोर नियम आहे.

महिलांना गाडी चालण्यासही बंदी

काही दिवसांपूर्वीच तालिबानने महिलांना वाहन परवाना देण्यावरही बंदी घातली आहे. अफगाणिस्तानातील सर्वात प्रगतीशील शहर हेरातमधील अधिकाऱ्यांना महिलांना वाहन परवाने देण्यास मनाई केली आहे.

मुलींच्या शिक्षणावरही बंदी

गेल्यावर्षी तालिबानने अफगाणिस्तानमधील मुलींच्या माध्यमिक शाळा पुन्हा उघडल्यानंतर काही तासांनी बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला अनेक मुली आणि महिलांनी विरोध दर्शवला होता. शाळा पुन्हा सुरु करण्यात यावी यासाठी तालिबानविरोधात निर्देर्शनही करण्यात आले होते.

पुरुषांशिवाय विमान प्रवासावर बंदी

तालिबानने महिलांच्या स्वतंत्र विमान प्रवसावर बंदी आणली आहे. त्या पुरुषांशिवाय देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकणार नसल्याचाही आदेश काढण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New decree issued by taliban orders women to wear burqa in public dpj

ताज्या बातम्या