PF खात्यातील रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर भरावा लागणार TAX, सरकारचे नवीन नियम

पीएफवरील व्याज मोजण्यासाठी पीएफ खात्यातच एक वेगळे खाते उघडले जाईल

New Income Tax Rules
केंद्र सरकारने नवीन आयकर नियमावली अधिसूचित केली आहे

केंद्र सरकारने नवीन आयकर नियमावली अधिसूचित केली आहे ज्या अंतर्गत विद्यमान भविष्य निधी खाती (PF) दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जातील. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, पीएफवरील व्याज मोजण्यासाठी पीएफ खात्यातच एक वेगळे खाते उघडले जाईल.

नवीन अधिसूचनेनंतर, सर्व कर्मचारी भविष्य निधी खाती करपात्र आणि कर-नसलेल्या योगदान खात्यांमध्ये विभागली जातील. CBDT अधिसूचनेनुसार ३१ मार्च २०२१ पर्यंत कोणत्याही योगदानावर कोणताही कर लावला जाणार नाही, परंतु २०२०-२१ आर्थिक वर्षानंतर पीएफ खात्यांवर मिळणारे व्याज करपात्र असेल आणि त्याची स्वतंत्र गणना केली जाईल. पीएफ खात्यात २०२१-२२ आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये वेगवेगळी खाती असतील.

CBDT ने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की नवीन नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू होतील, परंतु २०२१-२२ आर्थिक वर्षापर्यंत, जर तुमच्या खात्यात वार्षिक ठेव २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर मिळणारे व्याज करपात्र असेल. आणि त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल. लोकांना पुढील वर्षाच्या आयकर विवरणपत्रात या व्याजाची माहिती द्यावी लागेल.

हेही वाचा- EPF पासून LPG पर्यंत… आजपासून बदलल्या ‘या’ गोष्टी; सर्वसामान्यांचा खिसा होणार खाली

यापुर्वी देखील २०१६ मध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या एकूण रकमेपैकी ६० टक्के रकमेच्या व्याजावर कर लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होत्या. त्यानंतर या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी तो प्रस्ताव मागे घेतला होता. लोकसभेमध्ये निवेदन करून त्यांनी हा प्रस्ताव मागे घेत असल्याचे स्पष्ट केले होते. विविध कर्मचारी संघटना आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सरकारच्या या प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New income tax rules tax paid on the interest of pf account central board of direct taxes srk