राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज(शुक्रवार) अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार, उपाध्यक्षपदी खासदार प्रफुल पटेल आणि मुख्य सरचिटणीसपदी खासदार सुनिल तटकरे यांची निवड जाहीर झाली आहे.
राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याने पक्षातील मुख्य सरचिटणीसपदी खासदार सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी फेरनिवड; दिल्लीतील पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव
याशिवाय महाराष्ट्रातून सरचिटणीस पदी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नरेंद्र वर्मा यांची वर्णी लागली आहे. तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांची देखील निवड झाली आहे.
खासदार सुनिल तटकरे यांच्यावर पक्ष संघटना, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक, किसान सेलची जबाबदारी तर नरेंद्र वर्मा यांच्यावर मीडिया आणि आयटी व जितेंद्र आव्हाड यांच्यावर कामगार, एससी, एसटी व सहकार या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.