New Parliament Building Inauguration by PM Modi : संसदेच्या नव्या इमारतीचं आज (२८ मे) उद्घाटन आणि लोकार्पण सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सेंगोलची (राजदंड) विधीवत पूजा करून लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला स्थापित केला आहे. तत्पूर्वी मोदींनी या सेंगोलला साष्टांग दंडवत घातला. यावेळी तामिळनाडूवरून आलेल्या संत मंडळींनी वैदिक मंत्रांचा जप केला. या विधींमध्ये पंतप्रधानांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लादेखील सहभागी झाले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला नवीन संसदेत प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवन विधी केले. यावेळी सेंगोलची पूजा केली. तसेच मोदींनी सेंगोल आणि उपस्थित संतांना साष्टांग दंडवत घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंगोलची पूजा केली, त्यानंतर संतांसमोर आदरपूर्वक साष्टांग नमस्कार केला. यानंतर संतांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सेंगोलसह नवीन संसद भवनात प्रवेश केला. त्यांनी सेंगोल म्हणजेच राजदंड लोकसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीच्या बाजूला वैदिक मंत्रोच्चारात स्थापित केला. सेंगोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राजदंडाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या राजदंडाकडे स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते. प्रतीकात्मकदृष्ट्या सत्तेचे हस्तांतर म्हणून ब्रिटिशांनी हा राजदंड पंडित नेहरू यांच्याकडे सोपवला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १४ ऑगस्ट १९४७ रोजी सायंकाळी १०.४५ वाजता हा राजदंड ब्रिटिशांकडून स्वीकारला होता. हे ही वाचा >> सत्तांतर, वाद, आंदोलनांसह अनेक ऐतिहासिक घटना पाहिलेल्या जुन्या संसद भवनाचं नेमकं काय होणार? ऐतिहासिक पर्श्वभूमी चोळ साम्राज्यात सत्ता एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सत्ता सोपवताना राजदंडाचा म्हणजेच सेंगोलचा वापर केला जायचा. या सेंगोलकडे प्रतीकात्मकतेने राजवट आणि सत्ता म्हणून पाहिले जायचे. नव्याने राज्याभिषेक झालेल्या राजाला हा सेंगोल देऊन न्याय्य तसेच पारदर्शक पद्धतीने राज्यकारभार करावा, असे सांगितले जाई.