दुसरीकडे पाहिलेली वस्तू विकत घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान

भारतीय वंशाच्या एका वैज्ञानिकासह काही संशोधकांनी एक नवीन तंत्रज्ञान विक सित केले

भारतीय वंशाच्या एका वैज्ञानिकासह काही संशोधकांनी एक नवीन तंत्रज्ञान विक सित केले असून, त्याचा वापर तुम्ही मित्राकडे किंवा कुठेही पाहिलेली एखादी खुर्ची, दिवा किंवा फर्निचर कुठून खरेदी करायचे व ते तुमच्या खोल्यांमध्ये कसे दिसेल हे सांगण्यासाठी केला जाणार आहे.

अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाचे सीन बेल यांनी सांगितले, की अनेक लोकांना दुसऱ्याच्या घरात पाहिलेली खुर्ची, फोटो किंवा इतर काहीही खरेदी करण्याची इच्छा असते, पण त्यांना ते कुठे मिळते हे माहिती नसते. यातील प्रणाली न्यूरल नेटवर्क ही असून, त्यात तुम्ही पाहिलेल्या वस्तूची प्रतिमा ही उत्पादकांनी त्यांच्या उत्पादनांची जी छायाचित्रे टाकलेली असतात, त्याचे कॅटलॉग किंवा विशेष संकेतस्थळे असतात त्यांच्याशी ताडून पाहिली जातात. न्यूरल नेटवर्क हा संगणक आज्ञावली कार्यक्रम असून, त्यात मेंदूतील न्यूरॉन्सच्या कामाची नक्कल केलेली असते. माहिती या आज्ञावलीला दिल्यानंतर संबंधित स्मृती केंद्रे कार्यान्वित होतात. ही क्रिया अगदी जैविक मेंदूसारखी घडते. मेंदूमध्ये सिनॅप्सेस असतात, त्यात ही क्रिया होत असते. डीप लर्निगमध्ये न्यूरॉन्सचे थर हे माहिती थरांच्या रूपात लक्षात ठेवत असतात. त्यात न्यूरॉन्सचा पहिला थर हा कडा, रेषा लक्षात ठेवतो, तर मधला थर भाग व आकार लक्षात ठेवतो. नंतरचे थर सर्व वस्तू व संकल्पनाच लक्षात ठेवतात. संशोधकांनी क्राउडसोर्सिगचा वापर करून प्रतिमांचा डाटाबेस तयार केला व तो न्यूरल नेटवर्क आज्ञावलीला दिला. यात सगळा डाटाबेस जुळणारी वस्तू शोधण्यासाठी धुंडाळावा लागत नाही, तर फिंगर प्रिंटच्या मदतीने ती ओळखली जाते. डाटाबेसचे स्थानिक ठिकाण व फोन नंबर व त्या भागाचा कोड नंबर यात ओळखला जातो. कॉर्नेल विद्यापीठाच्या कविता बाला यांनी सांगितले, की ही अतिशय वेगळी संकल्पना आहे. त्याचा उपयोग डिझाइन उद्योगातही होणार आहे. जर्नल एसीएम ट्रॅन्झक्शन्स ऑन ग्राफिक्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New technology for purchasing goods

ताज्या बातम्या