scorecardresearch

New York Airplane Crash : मृत्यू येणार हे समजलं, प्रवाशाचा बायकोला हृदय पिळवटून टाकणारा मेसेज; म्हणाला “मी तुझ्यावर…”

Airplane Crash :अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील वेस्टचेस्टर काऊंटी विमानताळाजवळ एका विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

New York Airplane Crash : मृत्यू येणार हे समजलं, प्रवाशाचा बायकोला हृदय पिळवटून टाकणारा मेसेज; म्हणाला “मी तुझ्यावर…”
सांकेतिक फोटो

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील वेस्टचेस्टर काऊंटी विमानताळाजवळ एका विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विमानात बेंजामीन चाफेट्झ आणि बोरूच तौब या दोन व्यक्ती प्रवास करत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेही अनुभवी वैमानिक होते. मात्र विमानाचा अपघात झाल्यामुळे दोघांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेआधी बेंजामीन यांनी आपल्या पत्नीला शेवटचा मेसेज केला. हा मेसेज वाचून हळहळ व्यक्त केली जात आहे. आमच्या विमानाचे इंजिन खराब झाले आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे प्रवाशाने आपल्या शेवटच्या मेसेजमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा >>> पक्षाध्यक्षपदाबाबत शिवसेनेच्या पक्षघटनेत नेमकं काय म्हटलंय? मुदत संपल्यावर खरंच उद्धव ठाकरेंचं पक्षाध्यक्षपद जाणार?

नेमकं काय घडलं?

गुरुवारी न्यूयॉर्क शहराजवळ एका छोट्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात विमान जंगलात जाऊन कोसळले. सिंगल इंजिन बिचक्राफ्ट ए३६एस या विमानातून ते प्रवास करत होते. जेएफके आंतरराष्ट्र्रीय विमानतळावरून या विनामाने १९ जानेवारी रोजी उड्डाण घेतले होते. उड्डाणानंतर काही क्षणांतच तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले.

हेही वाचा >>> पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष विनंत्या, शिफारशींमुळे आले मेटाकुटीला; म्हणाले, “कृपया…!”

पत्नीला केला शेवटचा मेसेज

यातील बेंजामीन नावाच्या प्रवाशाने विमान कोसळण्याअगोदर आपल्या पत्नीला मेसेज केला होता. त्याने शेवटच्या मेसेजमध्ये लिहिलेले शब्द वाचून सर्वांचेच डोळे पाणावत आहेत. त्याने आपल्या पत्नीला केलेल्या शेवटच्या मेसेजमध्ये “आमच्या विमानाचे इंजिन खराब झाले आहे. मी तुझ्यावर आणि आपल्या मुलांवर प्रेम करतो. मी आतापर्यंत तुझ्यासोबत जे काही केले त्याबद्दल माफी मागतो,” असे बेंजामीन आपल्या शेवटच्या मेसेजमध्ये म्हणाले आहेत.

हेही वाचा >>>मुंबईत करोना काळात मोठा घोटाळा? संदीप देशपांडेंच्या दाव्याने खळबळ, २३ जानेवारीला देणार पुरावे!

दरम्यान, विमानात तांत्रिब बिघाड झाल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलचा या विमानाशी संपर्क तुटला होता. त्यानंतर काही क्षणांतच हे विमान वेस्टचेस्टर काऊंटी विमानतळाजवळ असलेल्या एका जंगलात जाऊन कोसळले. या अपघातात दोन्ही प्रवाशांचा मृत्यू झाला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 12:48 IST

संबंधित बातम्या