scorecardresearch

Premium

पंतप्रधानांनी घालून दिला नवा आदर्श; देशहिताच्या ‘या’ कारणासाठी स्वतःचं लग्नच रद्द केलं!

ज्यांना नव्या निर्बंधांमुळे, महामारीमुळे असे निर्णय घ्यावे लागले आहेत, त्यांचीही माफी पंतप्रधानांनी मागितली आहे.

jacinda Ardern
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

ओमायक्रॉन या करोनाच्या व्हेरिएंटचा प्रसार जगभरात वेगाने होत आहे. सर्वच देशांनी या व्हेरिएंटची धास्ती घेत आपापल्या देशातले निर्बंध कडक केले आहेत. न्यूझीलंडमध्येही वाढत्या ओमायक्रॉन प्रादुर्भावामुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे तिथल्या पंतप्रधानांनी चक्क स्वतःचं लग्नच रद्द केलं आहे.

न्यूझीलंडमध्ये करोना पार्श्वभूमीवर नव्या निर्बंधांची घोषणा करतानाच न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी आपण आपलं लग्न रद्द करत असल्याचीही घोषणा केली. नव्या निर्बंधांनुसार कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला १०० संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच उपस्थित राहता येणार आहे. आपलं लग्न रद्द करण्याच्या निर्णयानंतर जेसिंडा म्हणाल्या, देशातले अनेक नागरिक असे आहेत ज्यांना नव्या निर्बंधांमुळे, महामारीमुळे असे निर्णय घ्यावे लागले आहेत. मी त्याबद्दल त्यांची माफी मागते.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल

स्त्री राजकारण्यांसाठीचा ‘जेसिंडा पॅटर्न’!

न्यूझीलंडमध्ये लग्नसोहळ्यासाठी दुसऱ्या शहरात गेलेल्या एकाच कुटुंबातील ९ जणांना ओमायक्रॉनची लागण झाली. या कुटुंबाने ज्या विमानातून प्रवास केला त्या विमानातल्या एका कर्मचाऱ्यालाही ओमायक्रॉनची लागण झाल्याने देशात कडक निर्बंध लागू करण्यात आले. ओमायक्रॉन हा व्हेरिएंट करोनाच्या इतर कोणत्याही व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने पसरतो. मात्र त्यामुळे रुग्णांचा गंभीर आजार होण्याची शक्यता तुलनेने कमी आहे. पण खबरदारी म्हणून गर्दी न होण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. तर मास्क सार्वजनिक ठिकाणी बंधनकारक करण्यात आला आहे. हे नवे निर्बंध पुढच्या महिन्याच्या शेवटापर्यंत लागू राहतील.

उदारमतवाद-सर्वसमावेशकतेचे यश..

जेसिंडा आणि त्यांचे जोडीदार क्लार्क गेफॉर्ड यांनी आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली नव्हती. मात्र हे लग्न पुढच्या काही आठवड्यांमध्ये होणार असल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं होतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2022 at 08:24 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×