Vinesh Phogat पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला चौथं पदक निश्चित झालंय असं वाटत असतानाच एक वाईट बातमी येऊन धडकली. कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat ) हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार विनेशचे Vinesh Phogat वजन जास्त होते. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे, ज्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कुस्तीपटूचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे तिला अपात्र ठरवले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, विनेश रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही. ही बातमी समोर आल्यानंतर लोकसभेत राडा झाला आहे. लोकसभेत विरोधकांनी गदारोळ करत या प्रकरणी क्रीडा मंत्र्यांना उत्तर मागितलं आहे.

काय घडलं लोकसभेत?

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगट (Vinesh Phogat ) अपात्र ठरली आहे. त्यामुळे भारताला धक्का बसला आहे. या घटनेचे पडसाद लोकसभेतही उमटलेले पाहण्यास मिळाले. क्रीडामंत्र्यांनी यावर उत्तर दिलं पाहिजे असं म्हणत विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला. क्रीडा मंत्री उत्तर द्या अशा घोषणाही देण्यात आल्या. सभापती महोदय, आमचा प्रश्न आहे, विनेश फोगटला (Vinesh Phogat ) अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामागे नेमकं काय कारण आहे? या प्रकरणी क्रीडा मंत्र्यांनी उत्तर द्यावं असं म्हणत विरोधकांनी राडा सुरु केला. समाजवादी पक्षाचे खासदार बीरेंद्र सिंग बोलायला उभे राहिले तेव्हा विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली. या प्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना उत्तर मागितलं आहे. जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळ लोकसभेत पाहण्यास मिळाला.

AIMIM , Imtiaz Jaleel, constituency confusion,
इम्तियाज जलील यांच्यासह पाच उमेदवारांची एमआयएमकडून घोषणा, मतदारसंघाचा संभ्रम कायम
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Abhay Hadap as Secretary of Mumbai Cricket Association sport news
मुंबई क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी अभय हडप
Pratap Chikhalikar, Nanded by-election,
नांदेड पोटनिवडणूक लढण्यास प्रताप चिखलीकर पुन्हा इच्छुक
Jai Pawar, Yugendra Pawar, Kanheri,
कन्हेरीत कुस्ती आखाड्यात युवा नेते जय पवार आणि युगेंद्र पवार समोरासमोर
mahayuti, Abdul Sattar, Dhananjay Munde, Radhakrishna Vikhe Patil, state level events, agriculture festival, political power
माझा मतदारसंघ, ‘राज्यस्तरीय’ कार्यक्रमांची माझीच जबाबदारी, विविध महोत्सवांचा मंत्र्यांकडून पायंडा
Kolkata Doctor Rape and Murder
Kolkata Doctor Rape and Murder : “कोलकाता पीडितेला न्याय द्या!” पद्म पुरस्कार विजेत्या ७० डॉक्टरांचं पंतप्रधान मोदींना पत्र
Jharkhand Mukti Morcha leader and former Chief Minister Champai Soren hints at quitting the party
चंपई सोरेन लवकरच भाजपमध्ये? अचानक दिल्लीत दाखल झाल्याने चर्चांना उधाण

Paris Olympics 2024: “सुसाकीचा पराभव करणं हे…” नीरज चोप्राचं विनेश फोगटच्या कामगिरीवर विधान, वर्ल्ड चॅम्पियन युईच्या पराभवावर म्हणाला…

नेमकं काय घडलं?

‘कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. भारतीय पथकासाठी ही अतिशय निराशाजनक आणि दुर्दैवी गोष्ट’, असं भारतीय ऑलिम्पिक समितीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. भारतीय चमूने रात्रभरात तिच्या वजन नियंत्रणात असावं म्हणून तिच्या परिने पूर्ण प्रयत्न केले मात्र सकाळी केलेल्या वजन चाचणीत तिचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट झालं. भारतीय पथक यासंदर्भात याव्यतिरिक्त काहीही भाष्य करणार नाही. विनेशच्या खासगीपणाचा अधिकार जपावा अशी विनंती भारतीय ऑलिम्पिक समितीने केली आहे.

Vinesh Phogat Disqualified From Paris Olympics Gold Medal Match in Olympic Games 2024
विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकच्या सुवर्णपदक सामन्यातून अपात्र ठरली

क्रीडामंत्री दुपारी ३ वाजता देणार उत्तर

ही बातमी समोर आल्यानंतर विनेश फोगटबाबतचा मुद्दा उपस्थित करत लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी या प्रश्नाबाबत क्रीडामंत्र्यांनी बोलावं अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता क्रीडा मंत्री दुपारी ३ वाजता या प्रश्नी उत्तर देणार आहेत.