वास्को रेल्वे स्थानकावर घुटमळत देशातील बॉम्बस्फोटांची माहिती मिळवत असताना अटक करण्यात आलेल्या समीर सारदाना या युवकाची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी गुरुवारी कसून चौकशी केली. लष्करातून निवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याचा समीर हा मुलगा आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी गुरुवारी सकाळी येथे आले आणि त्यांनी समीरची गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यालयात चौकशी केली, असे दहशतवादविरोधी पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले. वास्को रेल्वे स्थानकावर घुटमळत असताना समीरला बुधवारी अटक करण्यात आली त्यावेळी त्याच्याकडे पाच पासपोर्ट आणि एक लॅपटॉप आढळला.

Story img Loader