दहशतवाद्यांकडून आर्थिक रसद, फुटीरतावादी नेते ‘एनआयए’च्या रडारवर

तपास यंत्रणेकडून प्राथमिक चौकशी

फुटीरतावादी नेते गिलानी आणि इतर. (संग्रहित)

मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून जम्मू-काश्मीरमधील हुर्रियत नेते एस.ए.एस गिलानी, नईम खान, फारुख अहमद डार या नेत्यांना होणाऱ्या फंडिगची (आर्थिक रसद) राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून (एनआयए) चौकशी करण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेते राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर आले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील एनआयएचे पथक श्रीनगरला पोहोचले. त्यांनी मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून फुटीरतावादी नेते एस. ए. एस. गिलानी, नईम खान आणि फारुख अहमद डार यांच्यासह इतरांना पुरवण्यात येणाऱ्या आर्थिक रसदीसंबंधी प्राथमिक चौकशी केली. त्यामुळे आगामी काळात दहशतवाद्यांकडून फुटीरतावादी नेत्यांना होणाऱ्या आर्थिक रसदीवर तपास यंत्रणांची करडी नजर राहणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nia registers preliminary enquiry funding hurriyat leaders geelani naeem khan in jammu kashmir hafiz saeed pak based terrorists

ताज्या बातम्या