नीरव मोदीचं भारत प्रत्यर्पण आणखी लांबणार; कारण…

परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीला युनाईटेड किंगडम उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

nirav-modi-fb
नीरव मोदीचं भारत प्रत्यर्पण आणखी लांबणार; कारण… (File Photo)

परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीला युनाईटेड किंगडम उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मानसिक आरोग्याच्या कारणास्तव भारतात प्रत्यपर्णाविरोधात याचिका दाखल करण्यास मंजुरी दिली आहे. नीरव मोदीच्या वकिलांनी त्याची प्रकृती ठिक नसल्याचं कारण देत प्रत्यर्पणास विरोध केला होता. वकिलांचा हा दावा न्यायालयाने मान्य करत प्रत्यर्पणाविरोधात याचिका करण्यास मंजुरी दिली आहे.

“नीरव मोदीच्या वकिलांनी त्याच्या मानसिक आरोग्याविषयी आणि आत्महत्येच्या शक्यतेबाबत उपस्थित केलेल्या चिंता वादास पात्र आहे. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आत्महत्येचे प्रयत्न यशस्वीपणे रोखण्याच्या क्षमतेचा मुद्दाही यावेळी चर्चेत येतो. त्यामुळे नीरवला याचिका दाखल करण्यास मंजुरी देत आहोत”, असेही न्यायाधीशांनी नमूद केले आहे. मानवी हक्कांवरील युरोपियन अधिवेशन, जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेचा कलम तीन आणि युके गुन्हेगारी न्याय कायदा २००३ चे कलम ९१ अंतर्गत याचिका आरोग्याशी संबंधित आहे.

नीरवच्या वकिलांनी मानसोपचारतज्ज्ञ डॉ अँड्र्यू फॉरेस्टरच्या अहवालाचा संदर्भ दिला होता. फॉरेस्टरने २७ ऑगस्ट २०२० च्या अहवालात म्हटले होते की या क्षणी नाही, परंतु नीरवमध्ये आत्महत्या करण्याच्या प्रवृत्ती वाढण्याचा धोका आहे. गृहमंत्री प्रिती पटेल यांच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर वकिलांनी युक्तिवाद केला.”कोविड -19 साथीमुळे आरोग्य यंत्रणा वाईट रीतीने प्रभावित झाली आहे. त्यांनी भारत सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवू नये.”,

“टीएमसी नेत्यांवरील हल्ल्यामागे अमित शाह यांचा हात”; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी काही बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून पंजाब नॅशनल बॅंकत १३,५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी सध्या लंडनमधील एका तुरूंगात आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी करत असून, त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nirav modi permission to appeal against extradition to india on mental health ground rmt