निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात आता चारही आरोपींना पहाटे साडेपाच वाजता फासावर लटकवण्यात येण्याआधी रात्रभर नाट्यमय घडामोडी सुरु होत्या. फाशी टळावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आरोपींनी प्रयत्न केले. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास दोषींची याचिका फेटाळून लावली. या निकालानंतर निर्भयाच्या दोषींना काही तासाच फाशी देण्यात आली. सकाळी साडेपाच वाजता निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यात आली. आरोपींना फाशी दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना निर्भयाच्या वडीलांना दोषींना शिक्षा झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

आणखी वाचा- “आजचा सूर्य देशातील मुलींसाठी उगवेल, २० मार्च निर्भया दिवस म्हणून साजरा केला जाईल”

“या क्षणाची आम्ही मागील सात वर्षांपासून वाट पाहत होतो. आज केवळ आमच्यासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी मोठा दिवस आहे,” असं निर्भयाच्या वडीलांनी व्यक्त केलं. “आजचा दिवस हा न्यायचा दिवस आहे. महिलांना न्याय मिळाल्याचा दिवस आहे. निर्भया आज नक्कीच आनंदी असेल. आज आम्हाला खऱ्या अर्थाने शांती मिळाली,” असं निर्भयाच्या वडीलांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- ‘निर्भयाची आई’ ही माझी ओळख अभिमानास्पद! आज ती असती तर…

विलंबावर नाराजी

२०१३ सालच्या प्रकरणातील दोषींना फाशी देण्यास सात वर्षाचा कालावधी लागल्याबद्दल निर्भयाच्या वडीलांना नाराजी व्यक्त केली. “महिलांसंदर्भातील आरोपांमध्ये योग्य नियम बनवले पाहिजेत. त्यामुळे पिडितेच्या कुटुंबियांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागणार नाही,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

फोटोगॅलरी >> फाशी देताना तुुरुंगात नक्की काय काय घडतं? जाणून घ्या १५ गोष्टी

२०१२ साली १६ डिसेंबरच्या रात्री दिल्लीत धावत्या बसमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणात सात वर्षे तीन महिन्यांनंतर दोषींना फासावर लटवण्यात आलं. २३ वर्षीय तरुणीवर सहा जणांनी बलात्कार केला होता. या घटनेनंतर १५ दिवस पिडित तरुणी मृत्यूशी झुंज देत होती. या घटनेनंतर देशभरामध्ये आंदोलने करण्यात आली होती.