Nirmal Purja Death Broad Peak Avalanche: प्रसिद्ध नेपाळी-ब्रिटिश गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांचे निधन झाले आहे. पाकिस्तानातील ब्रॉड पीकवर झालेल्या हिमस्खलनात त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या सह-मालकीच्या गिर्यारोहण कंपनीने निवेदनाद्वारे दिली आहे. ३० जुलै २०२६ रोजी ब्रॉड पीक मोहिमेवर असताना निर्मल पुर्जा यांचे पथक हिमस्खलनात अडकले. या दुर्घटनेनंतर गिर्यारोहकांशी संपर्क पूर्णपणे तुटल्याची माहिती माहिती पाकिस्तानी गिर्यारोहण प्राधिकरणाने दिली आहे.
एलीट एक्सपेड संस्थेने दिली निधनाची माहिती
निर्मल पुर्जा यांच्यासह गिर्यारोहक मिग्मा डेव्हिड शेर्पा आणि तेजन गुरुंग यांच्या मालकीच्या एलीट एक्सपेड या संस्थेने इंस्टाग्रामवर एक निवेदन प्रसिद्ध करून पुर्जा यांच्यासह इतर सदस्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. “अतिशय जड अंतःकरणाने आम्ही हे सांगत आहोत की, ब्रॉड पीकवरील हिमस्खलन दुर्घटनेत निर्मल निम्स दाई पुर्जा यांचे निधन झाले आहेत. या मोहिमेतील इतर सदस्यांचे देखील निधन झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.”
निर्मल पुर्जा यांच्या कामगिरीचे कौतुक
“जगातील एक महान गिर्यारोहक आपण गमावला आहे. पुर्जा यांनी नेतृत्व, धैर्य, नम्रतेने आणि क्षमता आपल्या विचारांपेक्षा अधिक होती या विश्वासाने लाखो लोकांना प्रेरणा दिली. तुम्ही मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करता, स्वतःवर विश्वास ठेवता, तेव्हा त्यांना काय करु शकतो हे जगाला दाखवून द्यायचे असते,” असेही या निवेदनात पुढे म्हटले आहे.
कोण होते निर्मल पुर्जा?
निर्मल पुर्जा यांचा जन्म नेपाळमधील २५ जुलै १९८३ रोजी गणपती प्रदेशातील म्याग्दी जिल्ह्यात झाला होता. पुर्जा हे ब्रिटनच्या लढाऊ दलाचे माजी सैनिक होते. ‘निम्स दाई’ म्हणून जगभर ओळखले जाणारे ४३ वर्षीय निर्मल यांनी २०१९ मध्ये जगातील १४ सर्वात उंच शिखरे अवघ्या १८९ दिवसांत सर करून जागतिक विक्रम केला होता. निर्मल पुर्जा यांच्यावर आधारित ‘१४ पीक्स: नथिंग इज इमपॉसिबल’ ही डॉक्युमेंटरी देखील प्रदर्शित झाली होती. दरम्यान, २०२३ मध्ये हा विक्रम मोडला गेला.
२०२१ मध्ये, हिवाळ्यात के२ शिखरावर यशस्वी चढाई करणाऱ्या १० नेपाळी गिर्यारोहकांच्या पथकात पुर्जा यांचा समावेश होता. गिर्यारोहक होण्यापूर्वी पुर्जा यांनी ब्रिटनच्या ‘ब्रिगेड ऑफ गोरखाज’मध्ये सेवा बजावली होती आणि त्यानंतर ते रॉयल मरीनच्या ‘स्पेशल बोआट स्क्वॉड्रन’मध्ये दाखल झाले होते.
ब्रॉड पीक: जगातील एक सर्वोच्च शिखर
पाकिस्तानातील जगातील एक सर्वोच्च डोंगर असलेल्या ब्रॉड पीकवर तीव्र हिमस्खलन झाल्यानंतर हे गिर्यारोहक बेपत्ता झाले होते. यामध्ये ६ नेपाळी गिर्यारोहक आणि पाकिस्तान, ओमान, अमेरिका व चीनमधील प्रत्येकी एक गिर्यारोहक सामील होता. गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हिमस्खलन झाल्यानंतर हे सर्वजण संपर्काबाहेर गेले. ब्रॉड पीकची उंची ८,०५१ मीटर असून ते के२ जवळ पाकिस्तानच्या काराकोरम पर्वतरांगेत स्थित आहे. जगातील १२ वे सर्वात उंच शिखर म्हणून गणले जाणारे हे शिखर गिर्यारोहकांसाठी अत्यंत कठीण मानले जाते.
