केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची परिणामकारक अंमलबजावणी कशी करता येईल, याबाबतचा मसुदा तयार करण्यासाठी नीती आयोग लवकरच एक कार्यकारी गट स्थापन करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपगटाने पहिल्या बैठकीत केलेल्या सूचनांचा विचार मसुदा तयार करताना केला जाणार आहे.
विविध मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनांच्या आधारे मसुदा अहवाल तयार करण्यासाठी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधूश्री खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यकारी गट स्थापन करण्याचे ठरविले आहे, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.नीती आयोगाची पुढील बैठक २७ एप्रिल रोजी होणार असून, त्या वेळी या अहवालावर चर्चा होणार आहे, असेही चौहान म्हणाले. देशातील ११ मुख्यमंत्र्यांच्या उपगटाचे चौहान हे निमंत्रक आहेत.