Nitin Gadkari on Road Accidents: भाजपाचे नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात. विकासाच्या प्रश्नावर बोलत असताना ते प्रसंगी प्रशासन आणि सरकारवरही बरसतात. नुकतेच त्यांनी रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूबाबत लोकसभेत भूमिका मांडली. रस्ते अपघातात दररोज भारतात कुठे ना कुठे मृत्यू होत असतात. नुकतेच मुंबईच्या कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर गुरुवारी सीएसएमटी परिसरात बेस्ट बसखाली येऊन एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. तर खासगी वाहन आणि ट्रकची धडक लागून अनेकांचा मृत्यू होत असतो. याबाबत लोकसभेत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, मी जेव्हा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होतो आणि रस्ते अपघाताचा विषय आला की, माझ्यावर तोंड लपविण्याची वेळ येते.

भारतात रस्ते अपघातात मोठी वाढ झाली असून यात बदल घडविण्यासाठी मानवी स्वभावात बदल होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी जेव्हा पहिल्यांदा या खात्याचा पदभार स्वीकारला होता. तेव्हा रस्ते अपघातात ५० टक्के घट करण्याचे ध्येय ठेवले होते. पण अपघात कमी होणे दूरच राहिले, तर त्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली, अशी कबुलीच गडकरी यांनी दिली. त्यामुळेच मी जेव्हा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होतो, तेव्हा रस्ते अपघाताचा विषय निघाल्यानंतर मला तोंड लपवावे लागते, असे ते म्हणाले.

Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rohit Pawar angry on Fadnavis Govt as after 35 days Santosh Deshmukh killers not punished Brother Dhananjay protesting
“न्याय देणारी व्यवस्था आरोपीला वाचवण्यासाठी…”, धनंजय देशमुखांच्या आंदोलनानंतर रोहित पवारांचा सरकारवर संताप
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Sarangi Mahajan Serious Allegations on Dhananjay and Pankaja Munde
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप, “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडप केली, वाल्मिक कराड…”
kalyan MNS citizens road agaitationTruck crushes mother, child
कल्याणमध्ये ट्रकने आई, मुलाला चिरडले; मनसेसह नागरिकांचे रस्ता रोको

रस्ते अपघातात दरवर्षी १.७८ लाख मृत्यू

गुरुवारी लोकसभेत शून्य प्रहरात पुरवणी प्रश्नांना उत्तर देत असताना नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांवर भाष्य केले. ते म्हणाले, अपघात कमी करण्यासाठी मानवी स्वभावात बदल करावा लागेल. समाजालाही बदलावे लागेल. तसेच कायद्याचा सर्वांना सन्मान करावा लागेल. भारतात दरवर्षी रस्ते अपघातात १.७८ लाख बळी पडतात. त्यात ६० टक्के पीडित हे १८ ते ३४ वयोगटातील आहेत, अशीही माहिती गडकरी यांनी दिली.

कोणत्या राज्यात सर्वाधिक मृत्यू?

उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू होत आहेत. एकूण अपघातांपैकी १३.७ टक्के म्हणजे २३,००० मृत्यू एकट्या उत्तर प्रदेशमध्ये झाले. त्यानंतर तमिळनाडूमध्ये १०.६ टक्के म्हणजे १८,००० मृत्यू झाले. तर तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र असून ९ टक्के म्हणजेच १५,००० मृत्यू झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. त्यानंतर चौथ्या क्रमाकांवर मध्य प्रदेशमध्ये १३,००० मृत्यू झाले आहेत.

हे वाचा >> Natasha Awhad: “… म्हणून मविआला ५० च्या खाली रोखलं” जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विधानसभा निकालावर खळबळजनक दावा

शहरांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सर्वाधिक मृत्यू दिल्लीमध्ये झाले आहेत. दिल्लीत वर्षाला १,४०० मृत्यू झाले असून त्याखालोखाल बंगळुरूचा (९१५) क्रमांक लागतो.

अपघाताच्या कारणांबाबत बोलत असताना रस्त्यावर उभ्या केलेल्या ट्रक अपघातांसाठी मोठे कारण बनत असल्याचे ते म्हणाले. तसेच अनेक ट्रकचालक महामार्गावर लेनची शिस्त पाळत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघाताचे उदाहरण देताना ते म्हणाले की, भारतात बस बनविणाऱ्या कंपन्यांना आंतरराष्ट्रीय मानकानुसार बस निर्मिती करण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून अपघातानंतर खिडकीजवळ असलेल्या हातोडीने काच फोडून प्रवाशाला तात्काळ बाहेर पडता येईल.

Story img Loader