केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज जम्मू -काश्मीरमधील आशियातील सर्वात लांब झोजिला बोगद्याचा आढावा घेतला.या बोगद्यामुळे लेह ते श्रीनगर हे अंतर तीन तासांनी कमी होणार आहे. झोजिला बोगदा ऑल वेदर रोड कनेक्टिव्हिटी अंतर्गत बांधला जात आहे, हा आशियातील सर्वात लांब बोगदा असणार आहे.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जोजिला बोगद्याचे काम अतिशय वेगाने सुरू आहे, आम्हाला आशा आहे की ते २३ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि पंतप्रधान २६ जानेवारीला त्याचे उद्घाटन करतील. मोदी सरकार आल्यावर जम्मू -काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग १,६९५ किलोमीटर लांबीचा होता, पण आता तो २,६६४ किलोमीटरचा झाला आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, हा बोगदा बनवण्यासाठी उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. झेड मोर्चा आणि नीलग्रह आणि झोजिलासह सुमारे दहा हजार कोटींचा प्रकल्प आहे. नितीन गडकरी म्हणाले की, शिमला ते रोहतांग मार्गे लेह, झोजिला, सोनमार्ग ते श्रीनगर या मोठ्या बोगद्याचे काम सुरू आहे. वर्षातील सहा महिने सर्व काही थांबते. अशा स्थितीत येत्या काही दिवसांमध्ये शिमला ते श्रीनगरपर्यंत दळणवळण शक्य होईल. नितीन गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग सुंदर करण्यासाठी दोन्ही बाजूला फुलांची रोपे असावीत. लोकांना वाटले पाहिजे की ते फुलांच्या व्हॅलीमध्ये येत आहेत.

नितीन गडकरी म्हणाले की, मी हेलिकॉप्टरमधूनच बाबा अमरनाथ यांचं दर्शन घेतलं आहे. यात्रेकरूंना सुविधा मिळावी म्हणून मी ही यात्रा अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. झोजिला बोगद्याची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की, सोनमर्गचा सुमारे ६.५ किमीचा झेड-मोड बोगदा नीलगढ बोगदा आणि झोजिला बोगद्याला जोडला जाईल, ज्यामुळे वाहतूक सुरळीत होईल. या भागात बोगदा बांधल्यामुळे सुमारे तीन ते चार हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. नितीन गडकरी म्हणाले की, या भागात बोगदा बांधल्यामुळे युवकांना भरपूर रोजगार मिळेल.