scorecardresearch

भाजपाला हरवण्याचा फॉर्म्युला काय?; नितीन गडकरी म्हणाले, “विरोधकांनी भाजपाला…”

यावेळी नितीन गडकरींनी त्यांचा राजकारणात प्रवेश कसा झाला, याबद्दलची आठवण सांगितली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाचपैकी चार राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्यात यश आले आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपा किंवा भाजपाच्या पाठिंबा असलेल्या पक्षांचे सरकार आहे. भाजपाचा विजयाचा रथ रोखण्यासाठी विरोधकांकडे सध्या कोणताही फॉर्म्युला असल्याचं दिसत नाही. कदाचित त्यामुळेच भाजपा एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकण्यात यशस्वी होत आहे.

काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा, हीच माझी इच्छा – नितीन गडकरी

एबीपी न्यूजच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अँकरने एकामागोमाग एक राज्यात भाजपा सरकार बनवत आहे, पण भाजपाला हरवायचे असेल तर विरोधी पक्षाने कोणता फॉर्म्युला वापरायला हवा?, असा सवाल केला. यावर नितीन गडकरी म्हणाले की, “मी भाजपाला जिंकण्याचा मार्ग सांगू शकतो, पराभव करण्याचा मार्ग विरोधकांनी शोधायला हवा.”

“पराभवामुळे निराश होऊन पक्ष सोडू नका, एकदिवस…”; नितीन गडकरींचं काँग्रेस नेत्यांना आवाहन

नितीन गडकरी म्हणाले की, “मी आणीबाणीतला प्रॉडक्ट आहे. जे.पी. आंदोलनाच्या वेळी मी अभ्यास करत होतो. त्यानंतर अचानक जनता दलासोबत राजकारणात प्रवेश केला. दरम्यान, १९८० मध्ये पुण्याला गेलो. भाजपात प्रवेशानंतरची ही पहिलीच सभा होती, मला हजेरी लावायची होती. त्यावेळी अटलजीही निवडणूक हरले होते आणि आमचे फक्त दोन खासदार होते.”

भाजपानं उत्तर प्रदेश मोदींमुळे जिंकला की योगींमुळे?; नितीन गडकरी म्हणतात…

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, “आमचे दोन खासदार असल्यामुळे आम्ही आणि आमचा पक्ष संपला असं लोक म्हणत होते. परंतु आम्ही काम करत राहिलो आणि आज या पदावर पोहोचलो आहोत. मी विरोधकांना सांगू इच्छितो की राजकारणात कोणताही पराभव अंतिम नसतो. त्यामुळे विरोधकांनी काम करत रहावं, पराभव होतोय तर एकदिवस विजय नक्की होईल.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nitin gadkari tells formula to opposition to defeat bjp hrc

ताज्या बातम्या