बिेहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवला. . नितीश कुमार यांच्या जेडीयूने एनडीएसोबतची युती तोडत भाजपाला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाला दुसरा मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा-बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांनी भाजपासोबतची युती तोडली

बिहारमधील समीकरणं बदलण्याची शक्यता

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर आता बिहारमधील समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. आज नितीश कुमार यांच्या घरी जेडीयूच्या खासदार आणि आमदरांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. भाजपा आणि जेडीयूची युती तुटल्यानंतर नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षासोबत युती करत नवीन सरकार स्थापन करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय जनता दल आणि जेडीयूच्या युतीला काँग्रेसने यापूर्वीच पाठिंबा दर्शवला होता. या नव्या सरकारमध्ये नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील असेही सांगण्यात येत आहे.
दोन वर्षांपूर्वीच भाजपा आणि जेडीयू पक्षाने युती केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि भाजपामध्ये सुरु असलेला वाद शिगेला पोहचला होता. अखेर नितीश कुमारांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवून आणला आहे.

हेही वाचा- ‘तीन दिवसात बॉम्बने उडवून देऊ’; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी

नीति आयोगाच्या बैठकीला नितीश कुमार अनुपस्थित

नुकत्याच पार पडलेल्या नीति आयोगाच्या बैठकीला नितीश कुमार अनुपस्थित होते. मागील एक महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीतही नितीश कुमार दुसऱ्यांदा गैरहजर राहिले होते. त्यामुळे नितीश कुमार आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे कोणत्याही क्षणी बिहारमधील सत्ताधारी भाजपा – जदयूमधील युती तुटेल, याबाबत तर्क वितर्क लावले जात होते. अखेर नितीश कुमार यांनी भाजपासोबतची युती तोडल्याची घोषणा केली आणि आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत भाजपाला धक्का दिला आहे.