scorecardresearch

‘हॅकिंग नाही, हार्डवेअरमधील बिघाडामुळे वेबसाईट डाऊन’

संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर चिनी शब्द दिसत असल्यामुळे ही साईट हॅक झाल्याची चर्चा होती. शुक्रवारी दुपारनंतर तांत्रिक गडबडीमुळे संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, निवडणूक आयोग, इपीएफओ, श्रम मंत्रालयसह सुमारे १० सरकारी वेबसाईट डाऊन झाल्या होत्या.

सरकारी वेबसाईट डाऊन होण्यामागे सायबर हल्ल्याचे वृत्त भारताच्या सायबर सिक्युरिटी प्रमुखांनी फेटाळले आहे.

सरकारी वेबसाईट डाऊन होण्यामागे सायबर हल्ल्याचे वृत्त भारताच्या सायबर सिक्युरिटी प्रमुखांनी फेटाळले आहे. हार्डवेअरमधील बिघाडमुळे वेबसाईट डाऊन झाली होती, असे त्यांनी सांगितले. अनेक तास वेबसाईट डाऊन राहिल्यानंतर आता सर्व सरकारी वेबसाईट सुरळितरित्या सुरू झाल्या आहेत.

भारताच्या संरक्षण खात्याची वेबसाईट झाली हॅक

राष्ट्रीय सायबर सिक्युरिटी समन्वयक गुलशन राय यांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. ते म्हणाले, कोणत्याही सरकारी वेबसाईटवर हल्ला झालेला नाही व कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. ही हार्डवेअरची समस्या होती. त्यामुळे सुमारे १० सरकारी वेबसाईट प्रभावित झाल्या.

सरकारी वेबसाईटची देखभाल करणाऱ्या राष्ट्रीय सूचना केंद्राच्या (एनआयसी) अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले की संरक्षण मंत्रालय आणि इतर मंत्रालयाच्या वेबसाईट हॅक झाल्या नव्हत्या आणि कोणत्याही प्रकारचा सायबर हल्ला झालेला नाही. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर चिनी शब्द दिसत असल्यामुळे ही साईट हॅक झाल्याची चर्चा होती. शुक्रवारी दुपारनंतर तांत्रिक गडबडीमुळे संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, निवडणूक आयोग, इपीएफओ, श्रम मंत्रालयसह सुमारे १० सरकारी वेबसाईट डाऊन झाल्या होत्या.

तत्पूवी शुक्रवारी दुपारी अचानक संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटच्या होमपेजवर चिनी शब्द दिसत होते. काही वेळानंतर गृहमंत्रालय आणि श्रम मंत्रालयाची वेबसाईटही डाऊन झाली होती. संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट उघडताच मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये रक्षा मंत्रालय लिहिल्याचे दिसत होते. पेज उघडण्यास खूप वेळ लागत होता. पेज उघडल्यानंतर Error बरोबर एक ओळीचा संदेश दिसत होता. ‘वेबसाईटमध्ये अचानक समस्या उद्भवली आहे. कृपया काही क्षणानंतर पुन्हा एकदा प्रयत्न करा’ असा संदेश स्क्रीनवर दिसत होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: No any government website hacked its hardware failure says cyber security chief

ताज्या बातम्या