पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) ५ हजार सैनिक तैनात करण्यात आल्याचे वृत्त निराधार असल्याचे सांगून चीनने त्याचे खंडन केले आहे.
पाच हजार लोक म्हणजे खूप होतात, इतक्या संख्येतील मुंग्याही सहज नजरेला पडू शकतात, असे चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे उपमहासंचालक हुआंग झिलिआन म्हणाले.
आधुनिक तंत्रज्ञान आणि उपग्रह यांच्यामुळे कुठलेही सैन्य कुठेही असले तरी ते नजरेस पडल्याशिवाय राहू शकत नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पीएलएच्या सैनिकांची उपस्थिती असल्याच्या बातम्या निराधार असल्याचे भारतासाठी नेमले गेलेले चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे संपर्क व्यक्ती असलेले हुआंग यांनी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
माझ्या पालकांना २४ तास विजेची  सुविधा उपलब्ध करु शकलो नाही!