No Confidence Motion in Lok sabha: लोकसभेतील अविश्वास ठरावावर सकाळी अकरावाजल्यापासून सुरु असलेल्या चर्चेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपले मत नोंदवले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या खास शैलीतील कविता ऐकवून संसदेतील सर्वांची मने जिंकली. अविश्वास ठरावाला क्रिकेट सामन्याची उपमा देत आठवलेंनी संसदेत चांगलीच शाब्दिक बॅटिंग केली. आजच्या टी-२० सामन्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी चांगल्या धावा काढल्यात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे विराट कोहली आहेत. ते राहुल गांधींहून दुप्पट धावा करतील आणि हा आजचा (अविश्वास ठरावाचा) सामना जिंकण्यासाठी आम्ही त्यांना नक्कीच मदत करु असं आठवलेंनी सांगिले. आठवलेंच्या या छोट्या भाषणामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

आठवले एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आज दिवसभरात संसदेत झालेल्या राहुल-मोदी गळाभेटीपासून ते काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीपर्यंत सर्वच गोष्टींचा आढावा घेणारी एक कवितेची त्यांनी ऑन द स्पॉट रचना केली आणि ती संसदेमध्ये ऐकवली. यमक जुळवणाऱ्या या कवितेची सुरुवात त्यांनी

आज राहुल गांधीजी ने प्रधानमंत्रीजी के गले को मिलाया गला
लेकीन नरेंद्र मोदी जी के पास है काँग्रेस को हराने की कला

या दोन वाक्यांने करताच सभागृहात पुन्हा एकदा हशा पिकला. पुढे कविता पुर्ण करताना त्यांनी आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवत पुढे…

काँग्रेस ने पुरे किए थे सत्ता में ५०-५१-५५ साल
तब उन्होने कमाया है बहुतही माल

२०१४ में नरेंद्र मोदीजी ने किया था बहुत बडा कमाल
इस लिए देश मे हो रहा है विकास का धमाल

काँग्रेस का  देश मे आज ठीक नही है हाल
इसलिए नरेंद्र मोदी जितेंगे २०१९ का साल

ही तीन कडवी रचून पुढील लोकसभा निवडणुकांमध्येही मोदीच जिंकतील अशी जणून भविष्यवाणीच करुन टाकली. आठवलेंच्या या यमक साधणाऱ्या कवितेमुळे सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनाही चांगलेच हसू फुटले.