स्पा आणि सलूनमध्ये भिन्नलिंगी व्यक्तीकडून मसाज करण्यास बंदी, ‘या’ महापालिकेनं जारी केली नियमावली

स्पा, सलून, ब्युटी पार्लरमध्ये कोणतेही विशेष चेंबर किंवा खोली असू नये आणि मुख्य दरवाजा पारदर्शक असावा,असेही सांगण्यात आले आहे.

spa-delhi
(प्रातिनिधीक छायाचित्र – इंडियन एक्सप्रेस)

गुवाहाटी महानगरपालिकेने नवीन नियमावली जारी केली आहे. या नियमावलीमध्ये जिल्ह्यातील स्पा, सलून आणि ब्युटी पार्लरमध्ये भिन्नलिंगी व्यक्तीकडून सेवा देण्यास किंवा मसाजला परवानगी नाही, यासारख्या तरतुदींचा समावेश आहे. “आम्ही स्पा, सलून, ब्युटी पार्लर इत्यादींसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आता भिन्नलिंगी व्यक्ती याठिकाणी थेरपी किंवा मसाज करू शकणार नाही,” असे गुवाहाटी महानगरपालिकेचे सहआयुक्त सिद्धार्थ गोस्वामी यांनी सांगितले.

“तसेच स्पा, सलून, ब्युटी पार्लरमध्ये कोणतेही विशेष चेंबर किंवा खोली असू नये आणि मुख्य दरवाजा पारदर्शक असावा,” असेही ते पुढे म्हणाले.

सहआयुक्त सिद्धार्थ गोस्वामी यांच्या म्हणण्यानुसार, “हे नियम काही स्पा आणि युनिसेक्स पार्लरबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला. हे स्पा आणि पार्लर नागरी समाजासाठी हानिकारक असल्याची नागरिकांची तक्रार होती, असे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: No massage from opposite sex guwahati issues new sops for spas salons hrc

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या