जर एखाद्या स्थानिक ग्रामपंचायतीचे अधिकारी ‘सर’ किंवा ‘मॅडम’ सारख्या नेहमीच्या औपचारिकतेऐवजी त्यांच्या नावाने किंवा पदनामाने संबोधित करत असतील तर तुम्हाला काय वाटेल? विचार करा. कदाचित तुम्ही अशी कधी कल्पनाही केली नसेल. पण असं खरंच घडलंय.

केरळमधल्या एका ग्रामपंचायतीने ही कल्पना सत्यात उतरवली आहे. उत्तर केरळमधील माथूर गाव पंचायतीने सामान्य लोक, लोकप्रतिनिधी आणि नागरी संस्था अधिकारी यांच्यातील अडथळा दूर करण्याच्या आणि एकमेकांमधील प्रेम आणि विश्वासाचे बंधन निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सर’ आणि ‘मॅडम’ सारख्या औपचारिक सन्मानांवर बंदी घातली आहे. माथूर ग्रामपंचायत अशी पहिली नागरी संस्था बनली आहे, ज्यांनी अशाप्रकारे नमस्काराच्या वापरावर बंदी घातली आहे. तसंच त्यांनी इतर नागरी संस्थांसाठी एक अनोखे सुधारणा मॉडेल सेट केले आहे.

नुकत्याच झालेल्या पंचायत परिषदेच्या बैठकीत एकमताने हा ऐतिहासिक निर्णय घेऊन नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू केली. राजकीय फरक बाजूला ठेवून, माकपचे सात उमेदवार आणि १६ सदस्यीय काँग्रेसशासित ग्रामपंचायतीतील भाजपाच्या एका सदस्याने या आठवड्याच्या सुरुवातीला या संदर्भात मांडलेल्या ठरावाला पाठिंबा दिला होता.
माथूर पंचायतीचे उपाध्यक्ष पी आर प्रसाद म्हणाले की, या निर्णयाचा मुख्य हेतू सामान्य लोकांमध्ये, जे त्यांच्या गरजांसह पंचायत कार्यालयांना भेट देतात आणि लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यातील अंतर कमी करणे आहे.

ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा…

“संपूर्ण राजकारणात, आमच्या पंचायतीतील प्रत्येकजण कार्यालयात मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. आमच्या सर्वांना असं वाटत होतं की एकमेकांना सर किंवा मॅडम म्हणणं आमच्यात आणि लोकांमध्ये त्यांच्या समस्यांशी संपर्क साधण्यासाठी अंतर निर्माण करतात”, असंही प्रसाद म्हणाले.

“लोकशाहीत लोक स्वामी असतात आणि लोकप्रतिनिधी आणि अधिकारी त्यांची सेवा करण्यासाठी तेथे असतात. आम्हाला त्यांच्यासाठी काहीही करण्याची विनंती करण्याची गरज नाही पण ते सेवेची मागणी करू शकतात. कारण हा त्यांचा हक्क आहे”, असंही त्यांनी सांगितलं.

या कार्यालयाबाहेर एक नोटीस लागलेली आहे. त्यात असे म्हटले आहे की, जर त्यांना सन्मानदर्शक संबोधनं न वापरल्याबद्दल कोणतीही सेवा नाकारली गेली तर ते थेट पंचायत अध्यक्ष किंवा सचिवांकडे तक्रार करू शकतात.
पंचायतीचे प्रत्येक अधिकारी त्यांच्या टेबलवर त्यांची नावे दाखवणाऱ्या पाट्या लावल्या आहेत. त्यांनी राजभाषा विभागाला “सर” आणि “मॅडम” साठी पर्यायी शब्द उपलब्ध करून देण्याची विनंती केली. ज्यांना वृद्ध अधिकाऱ्यांना त्यांच्या नावांनी संबोधण्यात अस्वस्थता वाटते, त्यांना मल्याळममध्ये “चेतन” (मोठा भाऊ) किंवा ‘चेची’ (मोठी बहीण) सारख्या मैत्रीपूर्ण संज्ञा वापरून त्यांना हाक मारु शकतात, असंही सांगण्यात आलं आहे. माथूर पंचायत अधिकाऱ्यांनी लोकशाहीत नागरिकांचे वर्चस्व सुनिश्चित करण्यासाठी सध्याच्या अर्ज फॉर्मच्या जागी अधिकार प्रमाणपत्र काढण्याचे ठरवले आहे.