“मीडियाच्या माध्यमातून माझ्याशी बोलण्याची गरज नाही”; सोनिया गांधींनी बैठकीतच काँग्रेस नेत्यांना खडसावलं

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू आहे

no need to speak to me through media Sonia Gandhi at CWC meet
संग्रहीत छायाचित्र

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी,  अशोक गेहलोत, आनंद शर्मा यांच्यासह पक्षाचे ५२ वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. कार्यकारिणीच्या बैठकीत नवीन अध्यक्षपदासाठी चर्चा होण्याची शक्यता होती. त्यानुसार याबाबत सोनिया गांधी यांनी भाष्य केले आहे. सोनिया गांधी यांनी याशिवाय सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुकांबाबतही चर्चा केली आहे.

यावेळी सोनिया गांधी यांनी बैठकीत काँग्रेस नेत्यांना सुनावले आहे. “मी पक्षाच्या नेत्यांशी खुल्या मनाने बोलते पण माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही,” असे म्हटले आहे. प्रत्येक पक्षाच्या सदस्याला काँग्रेसचे पुनरुज्जीवन हवे आहे, पण यासाठी एकता आणि पक्षाचे हित सर्वोपरी ठेवणे आवश्यक आहे असे सोनिया गांधी यांनी म्हटले.

त्या म्हणाल्या की, “मला माहित आहे की मी अंतरिम अध्यक्ष आहे, आधीच निवडणुका घ्यायच्या होत्या पण करोनामुळे निवडणुका घेऊ शकल्या नाहीत. आता पक्ष संघटनेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.”

सोनिया गांधींनी पक्षातील टीकाकारांना, विशेषत: ‘जी -२३’ नेत्यांना उद्देशून पूर्णवेळ आणि व्यावहारिक काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘जी -२३’ चे नेते बऱ्याच काळापासून संघटनेत व्यापक बदल आणि प्रभावी नेतृत्वासाठी निवडणुका घेण्याबाबत भाष्य करत आहेत.

“जर तुम्ही मला पूर्ण वेळ आणि व्यावहारिक काँग्रेस अध्यक्ष म्हणण्याची परवानगी दिली तर मी आहे,” असे पक्षाध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या. काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी आत्मसंयम आणि शिस्त आवश्यक आहे असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. “संपूर्ण संघटनेला काँग्रेसचे पुनरुज्जीवन करायचे आहे, पण या ऐक्यासाठी आणि पक्षाचे हित सर्वोपरी ठेवणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी आत्म-नियंत्रण आणि शिस्त आवश्यक आहे,” असे सोनिया गांधी म्हणाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: No need to speak to me through media sonia gandhi at cwc meet abn

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या