९/११च्या हल्ल्यात लादेन सहभागी असल्याचा कोणताही पुरावा नाही; तालिबानच्या प्रवक्त्याचा दावा

“लादेनचा वापर अमेरिकेने युद्धाचे निमित्त म्हणून केला होता,” असे तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे

No proof of Osama bin Laden role in 9 septemberattacks on US claims Taliban leader
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद (फोटो सौजन्य AP)

११ सप्टेंबर रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन या हल्ल्यांमध्ये सामील नव्हता आणि अमेरिकेने अफगाणिस्तानसोबत युद्ध करण्यासाठी त्याचा वापर केला होता असा दावा तालिबानने केला आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी एका मुलाखतीत युद्धाच्या २० वर्षांनंतरही ओसामा बिन लादेनचा ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्यात सहभाग असल्याचा पुरावा नाही असे म्हटले आहे.

एनबीसी न्यूजशी बोलताना तालिबानचे प्रवक्ते जबीबुल्लाह मुजाहिद यांनी एका मुलाखतीत हे विधान केलं आहे. “या युद्धाची कोणतीही गरज नव्हती. लादेनचा वापर अमेरिकेने युद्धाचे निमित्त म्हणून केला होता,” असे मुजाहिद म्हणाले.

तालिबान अफगाणिस्तानमध्ये ज्यांनी २६/११ चा हल्ला केला होता अशा अल-कायदासारख्या दहशतवादी संघटनांना आसरा देणार नाही याची हमी देऊ शकतो का, असा प्रश्न विचारला असता तालिबानच्या प्रवक्त्याने यावर उत्तर दिले आहे. “आम्ही वारंवार आश्वासने दिली आहेत की अफगाणिस्तानच्या जमीनवर दहशतवादाला सुरक्षित आश्रय मिळणार नाही,” असे त्यांनी म्हटले.

जबीउल्लाह मुजाहिद म्हणाले, “जेव्हा लादेन अमेरिकेसाठी समस्या बनला, तेव्हा तो अफगाणिस्तानात होता. पण त्याच्या सहभागाचा कोणताही पुरावा नव्हता आणि आम्ही आता वचन दिले आहे की अफगाणिस्तानची जमीन कोणाच्याही विरोधात वापरली जाणार नाही.”

तालिबानच्या राजवटीत हक्क गमावण्याच्या भीतीने जगत असलेल्या महिलांबद्दल विचारले असता मुजाहिद म्हणाले, “आम्ही महिलांचा आदर करतो, त्या आमच्या बहिणी आहेत. त्यांनी घाबरू नये. तालिबान्यांनी देशासाठी लढा दिला आहे. महिलांनी आमचा अभिमान बाळगला पाहिजे त्यांनी घाबरू नये.”

तालिबान राजवटीच्या भीतीने देश सोडून जाणाऱ्या हजारो अफगाणांबद्दल विचारले असता मुजाहिद म्हणाले, “देशवासीयांनी देश सोडून जावे अशी आमची इच्छा नाही. त्यांनी यापूर्वी जे काही केले आहे, आम्ही त्यांना माफी दिली आहे. आम्हाला आपल्या देशातील लोक, तरुण आणि शिक्षित लोकांची राष्ट्रासाठी गरज आहे. पण जर त्यांना जगायचे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: No proof of osama bin laden role in 9 septemberattacks on us claims taliban leader abn

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या