हिंसाचारात सामील असलेल्या गटांशी आम्ही चर्चा करणार नाही असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. एकोणिसाव्या राष्ट्रीय युवक महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
चर्चेसाठी आमची दारे खुली आहेत पण कुठल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार हिंसाचारात सामील असलेल्या गटांशी चर्चा करणार नाही, असे ते म्हणाले. ईशान्येकडील भागात असलेल्या अतिरेकी संघटनांना आवाहन करताना ते म्हणाले की, या संघटनांनी हिंसाचार थांबवावा, त्यांना गरीब लोकांचे प्रश्न माहिती नाहीत. गरिबांचे शिरकारण केले जाते तेव्हा युवकांनी शांत बसून न राहता त्यांनी या अतिरेक्यांच्या विरोधात लढा दिला पाहिजे मग अतिरेकी कितीही शक्तिशाली असेना. हे अतिरेकी गट हिंसाचार करीत आहेत व खंडणी उकळत आहेत हे थांबले पाहिजे, हिंसाचार व बंडखोरी थांबवण्यासाठी युवकांनीच सरकारला मदत करावी असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.