बारामुल्ला : काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठणकावले. येथे झालेल्या जाहीर सभेत पाकिस्तानशी चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या काश्मिरी नेत्यांवर त्यांनी टीका केली. काश्मीरमध्ये लवकरच पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेतल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

‘माझी पाकिस्तानशी चर्चा करण्याची इच्छा नाही, मात्र जम्मू-काश्मीरच्या जनतेशी मला बोलायचे आहे. मोदी सरकार हे दहशतवाद सहन करत नाही, तो नष्ट करते. जम्मू-काश्मीर हा देशातील सर्वात शांत प्रदेश व्हावा, यासाठी आम्ही काम करत आहोत,’’ असे शाह म्हणाले. निवडणूक आयोगाने अंतिम मतदारयादी तयार केल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि या निवडणुका संपूर्णत: पारदर्शक पद्धतीने पार पाडल्या जातील अशी हमीदेखील गृहमंत्र्यांनी दिली.

revanth reddy jibe on BJPs 400 Paar Slogan
“भाजपाला ४०० पार व्हायचं असेल तर पाकिस्तान, अफगाणिस्तान…”, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा टोला
mamata banerjee
‘काँग्रेस, कम्युनिस्ट हे भाजपाचे एजंट’, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या
west bengal chief minister bidhan chandra roy include berubari in indian territory from east pakistan
कचाथीवू गमावले, पण बेरूबारी कमावले… नेहरूंचा विरोध डावलून बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी कसा मिळवला पूर्व पाकिस्तानकडून भारतीय भूभाग?
Cm Himanta Biswa Sarma On Congress Manifesto
“हा तर पाकिस्तानच्या निवडणुकीसाठीचा जाहीरनामा”, हिमंता बिस्वा सरमांची खोचक टीका, म्हणाले…

१९९०च्या दशकापासून दहशतवादाने ४२,००० बळी घेतले. यामुळे काश्मिरी जनतेला काय फायदा झाला? सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे यंदा आतापर्यंत २२ लाख पर्यटक काश्मीरला आले. याचा किती लोकांना फायदा झाला असेल, याची कल्पना करा..

अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री