बारामुल्ला : काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठणकावले. येथे झालेल्या जाहीर सभेत पाकिस्तानशी चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या काश्मिरी नेत्यांवर त्यांनी टीका केली. काश्मीरमध्ये लवकरच पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेतल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘माझी पाकिस्तानशी चर्चा करण्याची इच्छा नाही, मात्र जम्मू-काश्मीरच्या जनतेशी मला बोलायचे आहे. मोदी सरकार हे दहशतवाद सहन करत नाही, तो नष्ट करते. जम्मू-काश्मीर हा देशातील सर्वात शांत प्रदेश व्हावा, यासाठी आम्ही काम करत आहोत,’’ असे शाह म्हणाले. निवडणूक आयोगाने अंतिम मतदारयादी तयार केल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि या निवडणुका संपूर्णत: पारदर्शक पद्धतीने पार पाडल्या जातील अशी हमीदेखील गृहमंत्र्यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No to talks with pakistan says home minister amit shah in kashmir zws
First published on: 06-10-2022 at 03:58 IST