Nobel Economics 2026 News & Informational Update: अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट ई. हॉल (Robert E. Hall) आणि मायकेल वूडफर्ड (Michael Woodford) यांना मॅक्रोइकॉनॉमिक स्टॅबिलायझेशनचे मायक्रोइकॉनॉमिक फाउंडेशन” या विषयावरील त्यांच्या संशोधनासाठी जाहीर करण्यात आला आहे. हॉल हे कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीशी, तर वूडफर्ड हे न्यूयॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीशी संबंधित आहेत. स्टॉकहोममधील ‘द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस’ने या दोन्ही अमेरिकन अर्थतज्ज्ञांच्या नावांची घोषणा केली.
नोबेल कमिटीचे अध्यक्ष जॉन हॅस्लर यांच्या मते, “या विजेत्यांच्या संशोधनाने सध्या जगभरातील मध्यवर्ती बँका आणि सरकारांद्वारे वापरल्या जाणाऱ्या मॉडेल्सना एक भक्कम सैद्धांतिक आधार दिला आहे.” अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराला पूर्वी बँक ऑफ स्वीडन प्राईझ इन इकॉनॉमिक सायन्सेस इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल म्हणून ओळखलं जात होतं.
पुरस्कार विजेत्यांच्या संशोधनाने काय झालं?
या वर्षीच्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची रक्कम ११ कोटी ४८ लाख रुपये ($1.2 million) इतकी आहे, जी वैयक्तिक विजेत्याला किंवा संस्थेला दिली जाते. हॉल आणि वूडफर्ड यांच्या संशोधनाने ‘न्यू केनेशियन मॉडेल्स’ (New Keynesian models) विकसित केले. हे मॉडेल स्थिरीकरण धोरणे आर्थिक चक्रांवर कसा परिणाम करतात हे स्पष्ट आणि मोजण्यास मदत करतात. सध्या जगभरातील मध्यवर्ती बँका आणि वित्त मंत्रालयांकडून याचा वापर केला जातो.
महामारी आणि ऊर्जा संकटाच्या काळात अत्यंत फायदेशीर
नोबेल समितीने नमूद केलं की, या अर्थतज्ज्ञांच्या संशोधनामुळे मोठ्या मॅक्रोइकॉनॉमिक संकटांचे व्यवस्थापन पूर्वीपेक्षा अधिक कार्यक्षम पद्धतीने करणं शक्य झालं आहे. समितीने ‘X’ वरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हॉल आणि वूडफर्ड यांचं संशोधन अलीकडच्या वर्षांतील महामारी आणि ऊर्जा संकटाच्या काळात अत्यंत फायदेशीर ठरलं आहे; त्यामुळे १९७० च्या दशकातील गंभीर कालखंडासारखे आर्थिक वाढ आणि महागाईवर दीर्घकालीन परिणाम झाले नाहीत.
गेल्या आठवड्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शांतता, वैद्यकशास्त्र आणि साहित्य या क्षेत्रांतील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.
