Jantar Mantar Viral Girl New Video Statement: दिल्लीच्या जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटीविरोधात झालेल्या आंदोलनात काही तरुणांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे व्हिडीओ समोर आले होते. कथित रुचिका सिंह नावाच्या मुलीच्या व्हिडीओमुळे सर्वाधिक वाद निर्माण झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलांना माफ केले जावे, असे म्हटले. या खोडकर मुलांना न्यायालयाचे खेटे मारायला लावू द्यायचे नाही, असेही पंतप्रधान म्हणाले. यानंतर या मुलीचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिने तिचे नाव रुचिका सिंह नसल्याचे म्हटले आहे. तसेच तिचे वय २५ नसून १५ आहे, असेही तिने पुन्हा म्हटले आहे.
आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलत असताना या मुलीने म्हटले की, मला माफ केले जाईल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. पंतप्रधान मोदींच्या संदेशामुळे आपल्याला दुसरे आयुष्य मिळाले आहे.
ती पुढे म्हणाली, “पंतप्रधान मोदींनी मला माफ केले. यामुळे मला खूप आनंद झाला आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. मी इतकी मोठी चूक केली होती की, यासाठी मला माफ केले जाईल, असे कधी वाटले नव्हते. आता सर्व काही संपले असून मी काहीच करू शकणार नाही, असे मला वाटले होते. पण त्यांनी मला माफ केल्यानंतर असे वाटते आहे की, ज्यांना मी इतके वाईटसाईट बोलले, त्यांनीच मला माफ केले आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे.”
Delhi: A 15-year-old student who made an objectionable remark against Prime Minister Narendra Modi during a protest at Jantar Mantar says, "I am very happy that PM Modi has forgiven me. It is a very big thing for me. In a way, I have got a second life. I made such a big mistake,… pic.twitter.com/MtpXhHqFdc
— IANS (@ians_india) August 1, 2026
लोकांनी मला चिथावणी दिली
तिने पुढे सांगितले की, ती जाणूनबुजून आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेली नव्हती. २३ जुलै रोजी ती मित्रांसह कनॉट प्लेसला गेली होती. तिथे जवळच आंदोलन सुरू असल्याचे कळल्यानंतर ती उत्सुकतेपोटी जंतर-मंतरवर गेली. तिथे अनेक तरुण-तरुणी यूट्यूबरशी संवाद साधत होते. तिथे उपस्थित लोक बरेच काही बोलत होते. मलाही त्यावेळी बोलण्यास उद्युक्त केले गेले. तुम्ही काहीही बोलू शकता, हा व्हिडीओ पोस्ट केला जाणार नाही, असे मला सांगण्यात आले होते.
Delhi: A 15-year-old student who made an objectionable remark against Prime Minister Narendra Modi during a protest at Jantar Mantar says, "I did not use those words unknowingly. I was provoked by people there. A lot of things were happening there, and people were saying many… pic.twitter.com/GFPCMLCW16
— IANS (@ians_india) August 1, 2026
मला जेव्हा काही यूट्यूबर्सनी बोलण्यास सांगितले तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारले होते. त्यांनी सांगितले की, मला बोलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
वय २५ नाही तर १५
माझ्यावर जो गुन्हा दाखल केला गेला, तो खोटा होता, असेही रुचिकाने सांगितले. माझे खोटे वय, खोटे नाव आणि चुकीचा पत्ता त्यावर टाकण्यात आला. माझे नाव रुचिका सिंह नाही आणि माझे वय २५ नाही तर १५ वर्ष आहे. माझ्यावर ज्यांनी खोटे आरोप लावले, त्यांच्यावरही कारवाई केली जावी. कारण या एफआयआरनंतर पोलीस माझ्या घरी येत आहेत, नातेवाईकांच्याही घरी जात आहेत.
दहावीत शिकते
पीडितेने पुढे सांगितले की, या एफआयआरनंतर मला बलात्काराच्या धमक्या दिल्या जात आहेत. लोक मला शोधत आहेत. मी सध्या दहावीच्या वर्गात शिकत आहे. मला हे सर्व सहन होत नाही आहे.
Delhi: A 15-year-old student who made an objectionable remark against Prime Minister Narendra Modi during a protest at Jantar Mantar, on receiving threats, says, "I am receiving threats from unknown numbers. Someone leaked my mobile number. I am being clearly told that wherever… pic.twitter.com/t3bc9i0wWx
— IANS (@ians_india) August 1, 2026
बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी
“कुणीतरी माझा नंबर व्हायरल केला, तेव्हापासून मला धमक्या येत आहेत. तू जिथे कुठे दिसशील तिथे तुझ्यावर अत्याचार करून तुला एखाद्या नाल्यात फेकून देऊ, अशी धमकी मला दिली जात आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी माफ करूनही पोलिसांनी खटला मागे घेतलेला नाही. पोलीस आजही माझ्या घरी येत आहेत. पोलीस मला प्रत्येक ठिकाणी शोधत आहेत. जसे काय मी मोठा गुन्हा केला आहे. मला हे सहन होत नाही”, असेही या मुलीने सांगितले.
