scorecardresearch

नोकियाच्या चेन्नई कारखान्यातील उत्पादनास १ नोव्हेंबरपासून स्थगिती

नोकिया कॉर्पोरेशन कंपनीने येत्या १ नोव्हेंबरपासून चेन्नई येथील कारखान्यातील मोबाइल दूरध्वनी संचांचे उत्पादन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नोकियाच्या चेन्नई कारखान्यातील उत्पादनास १ नोव्हेंबरपासून स्थगिती

नोकिया कॉर्पोरेशन कंपनीने येत्या १ नोव्हेंबरपासून चेन्नई येथील कारखान्यातील मोबाइल दूरध्वनी संचांचे उत्पादन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कारखान्यातील मोबाइल संच विकत घेण्याचा करार मायक्रोसॉफ्ट कंपनीने मोडित काढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे या कारखान्यातील सुमारे १,१०० कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. चेन्नईच्या श्रीपेरुंबुदूर या उपनगरात हा कारखाना आहे.
चेन्नई येथील कारखान्यातून तयार होणारे मोबाइल दूरध्वनी संच विकत घेण्यासंबंधीचा करार येत्या १ नोव्हेंबरपासून मोडीत काढण्यात येईल, असे मायक्रोसॉफ्टने नोकिया कंपनीला कळविल्यामुळे मायक्रोसॉफ्टकडून पुढील सूचना मिळेपर्यंत श्रीपेरुंबुदूरच्या कारखान्यातील उत्पादन स्थगित ठेवण्यात येईल, असे नोकियाने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-10-2014 at 12:58 IST

संबंधित बातम्या