साखरेऐवजी भाजलेल्या तांदळाचा वापर
जी चढत नाही व जिचा हँगओव्हर राहत नाही ती दारू कसली असे कुणीही म्हणेल, पण मद्य सेवन करूनही सकाळी प्रसन्न राहण्यासाठी उत्तर कोरियाच्या वैज्ञानिकांनी हँगओव्हर न येणारे मद्य तयार केले आहे. त्यात अल्कोहोल असले तरी त्याचा हँगओव्हर राहत नाही. हे मद्य जिनसेंग या चिनी वनस्पतीपासून तयार केले आहे. जिनसेंग ही वनस्पती आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असून ते जीवनाचे अमृत आहे, असा उत्तर कोरियाचा दावा आहे. हे मद्य ताडोनगँग फूडस्टफ कारखान्यात तयार केले असून त्यात साखरेतील अल्कोहोलऐवजी भाजलेला तांदूळ वापरला आहे. ही प्रक्रिया यशस्वी झाली आहे अनेक वष्रे विविध मिश्रणांवर काम केल्यानंतर हे मद्य तयार करण्यात यश आले आहे. आधी त्याची चव कडू होती पण ती बदलण्यात यश आले आहे. कोरयो लिकर असे या मद्याचे नाव असून ती केसाँग कोरयो इनसाम म्हणजे जिनसेंगपासून तयार केली आहे, यात जिनसेंगचा सहा वर्षांपूर्वीचा अर्क वापरला आहे. जिनसेंग ही औषधी वनस्पती मानली गेली असून त्याच्या जोडीला भाजलेला तांदूळ वापरला आहे. तज्ज्ञांनी हँगओव्हर नसलेल्या या मद्याची प्रशंसा केली असून आता दुसऱ्या दिवशी हँगओव्हर राहणार नसल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे, असे ‘प्याँगयाँग टाइम्स’ने म्हटले आहे. काही तज्ज्ञांनी हँगओव्हर मुक्त मद्याचा दावा फेटाळला असून तज्ज्ञांच्या मते अल्कोहोल पुरेशा प्रमाणात घेतले असेल तर त्याचा हँगओव्हर राहणार नाही, असे शक्यच नाही. चोसोन एक्सचेंजचे संचालक आंद्रे अब्राहमियन यांनी सांगितले की, अशा प्रकारचे अल्कोहोल शक्य नाही. उत्तर कोरियात उच्च दर्जाचे मद्य बनवले जाते पण ते हँगओव्हरमुक्त नाही व तसे ते तयार करणेही शक्य नाही असे त्यांनी द गाíडयनला सांगितले.