North Korea Nuclear Doctrine Amendment: एकीकडे अमेरिका – इस्रायलविरुद्ध इराण संघर्ष गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. तर, रशिया आणि युक्रेन यांच्यात चार वर्षापासून युद्ध सुरु आहे. युद्धामुळे जगावर सतत भीतीचे सावट पाहायला मिळत आहे. एखाद्या अण्वस्त्रसज्ज देशांने टोकाचे पाऊल उचलल्यास त्याचे विपरित परिणाम जगाला भोगावे लागू शकतात. याबाबत उत्तर कोरियाच्या भूमिकेकडे कायमच लक्ष लागलेले असते. येथील हुकूमशाह किंम जोंग नेहमीच युद्ध सराव, क्षेपणास्त्र चाचणी यामुळे चर्चेत असतो. आता याच उत्तर कोरियाने अण्वस्त्राच्या वापराबाबत अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे.
उत्तर कोरियात घटनादुरुस्ती
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंग जोंग यांची परकीय हल्ल्यात हत्या झाल्यास शत्रू राष्ट्रावर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या धोरणाला मान्यता देण्यात आली आहे. उत्तर कोरियाकडून अण्वस्त्राच्या वापराबाबत महत्वाची घटनादुरुस्ती करण्यात केली आहे. उत्तर कोरियाच्या प्योंगयांग येथे नुकतेच सर्वोच्च जनसभा नुकतेच पार पडले. या अधिवेशनात ही घटनादुरुस्ती स्वीकारण्यात आल्याचे टेलिग्राफने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सेवेच्या अधिकाऱ्यांबरोबर या दुरुस्तीची माहिती देण्यात आल्याचे वृत्तात म्हटलंय.
काय आहे घटनादुरुस्ती?
नव्या घटनादुरुस्तीनुसार, उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांची सगळी सूत्रे किंम जोंग यांच्याकडेच राहतील. पण, किंम यांची परकीय हल्ल्यात हत्या झाल्याचा त्याचा अण्वस्त्राचा वापर कसा करण्यात यावा याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. अण्वस्त्राचे प्रमुख आणि नियंत्रक यांच्यावर काही संकट झाल्यास अण्वस्त्र हल्ला करण्याची तरतूद यात करण्यात आली आहे. उत्तर कोरियाने अण्वस्त्र सार्वजनिक कायद्याच्या कलम तीनमध्ये सुधारणा केली आहे.
इराणनंतर उत्तर कोरिया सतर्क
अमेरिका आणि इराण युद्धात अण्वस्त्र कार्यक्रम हा कळीचा मुद्दा ठरला आहे. इराण अण्वस्त्र कार्यक्रम बंद करत नाही तोपर्यंत शांतता करार करणार नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. या संघर्षात हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. अशात किंम यांनी अण्वस्त्र वापराबाबत घेतलेला निर्णय उत्तर कोरियासाठी महत्वाचा मानला जात आहे. इराणमुळे उत्तर कोरिया सतर्क झाली असून, घटनादुरुस्तीचा विचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
किंम यांची काळजी
किंम जोंग सुरक्षेची सर्वाधिक काळजी घेतात. शक्यतो हवाई प्रवास टाळून कडेकोड सुरक्षा असलेल्या ट्रेनमधून प्रवासाला प्राधान्य देतात. प्योंगयांग या वर्षी दक्षिण कोरियाच्या सीमेजवळ एक नवीन लांब पल्ल्याची तोफखाना प्रणाली तैनात करण्याची योजना तयार करत, असे उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांचा हवाला देत एका वृत्तवाहिनीने वृत्त प्रसिद्ध केले आहे.
