एपी, सेऊल

उत्तर कोरियाचा मलिग्याँग-१ हा गुप्तहेर उपग्रह वाहून नेणारा चोलिमा-१ अग्निबाण समुद्रात कोसळल्यामुळे हे महत्त्वाकांक्षी प्रक्षेपण अयशस्वी झाले. उत्तर कोरियाने या मोहिमेची कल्पना सोमवारीच जपानला दिली होती. त्यानंतर दोनच दिवसांमध्ये ही मोहीम फसल्याचे उत्तर कोरियाने जाहीर केले. त्याच वेळी उपग्रह प्रक्षेपणाचा दुसरा प्रयत्न लवकरच केला जाईल असेही सांगण्यात आले.

Israel succeeded in preventing an unexpected attack by Iran
इराणचा अनपेक्षित हल्ला रोखण्यात इस्रायल यशस्वी; इराणनी सोडलेली ३०० हून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट
Iran attacks Israel four key questions
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आता पुढे काय होणार? अमेरिकेची भूमिका काय?
successfully test fired advanced missile Agni Prime from APJ Abdul Kalam Island
‘अग्नी-प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
India is the third most polluted country in the world What are the potential dangers of this
विश्लेषण : भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश! यातून कोणते धोके संभवतात?

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि दक्षिण कोरियाबरोबरचे संबंध ताणलेले असतानाच उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी महत्त्वाकांक्षी संरक्षण उपग्रहाच्या प्रक्षेपणाची मोहीम जाहीर केली होती. त्याला आता धक्का बसल्याचे मानले जात आहे. उत्तर कोरियाने केलेले उपग्रह प्रक्षेपण हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाविरोधात होते. या देशाने यापूर्वी केलेल्या उपग्रह प्रक्षेपणांमधून क्षेपणास्त्र तंत्रज्ञान सुधारले असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. त्यांनी अलीकडील काही वर्षांमध्ये संपूर्ण अमेरिका खंडापर्यंत पोहोचू शकेल असे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित केले आहे, मात्र अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी उत्तर कोरियाला अजून प्रयत्न करावा लागेल असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा प्रकारचे तीन ते पाच गुप्तहेर उपग्रह अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित केल्यास उत्तर कोरियाला कोरियन द्वीपकल्पावर टेहळणी करणारी यंत्रणा उभारता येईल असे अभ्यासकांनी सांगितले.

दरम्यान, या प्रक्षेपणाच्या वेळी दक्षिण कोरिया आणि जपानने आपापल्या देशातील नागरिकांना काही काळ बाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. दुसरीकडे, समुद्रात पडलेल्या अग्निबाणाचा काही भाग आपल्याला सापडल्याचे दक्षिण कोरियाच्या सैन्याने सांगितले आहे.