‘या’ देशातील पंतप्रधानांचा ‘सेक्स अॅक्ट’ व्हिडीओ लीक, राजीनामा देण्याची नामुष्की

पंतप्रधान पदावरील व्यक्तीकडून होणाऱ्या चुका थेट त्या देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न तयार करतात. त्यामुळे या पदावर असणाऱ्यांना खूप काळजी घ्यावी लागते.

देशाचं पंतप्रधान पद म्हणजे खूप जबाबदारीचं पद असतं. अशावेळी या पदावरील व्यक्तीकडून होणाऱ्या चुका थेट त्या देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न तयार करतात. त्यामुळे या पदावर असणाऱ्यांना खूप काळजी घ्यावी लागते. ही काळजी घेतली गेली नाही तर क्षणात त्या पदावरून दूर होण्याची वेळ येते. असंच एक उदाहरण उत्तर सायप्रसमध्ये (Northern Cyprus) पहायला मिळालंय. उत्तर सायप्रसचे पंतप्रधान इर्सन सॅनर (Ersan Saner) यांचा एक कथिक ‘सेक्स अॅक्ट’ व्हिडीओ लीक झाल्यानंतर त्यांच्यावर थेट पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की आलीय.

इर्सन सॅनर यांनी या कथिक सेक्स अॅक्ट व्हिडीओनंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असला तरी त्या व्हिडीओत आपण नसल्याचा दावा सॅनर यांनी केलाय. तसेच हा त्यांना बदनाम करण्यासाठीचा प्रयत्न असल्याचा आरोप केलाय. ५४ वर्षीय इर्सन सॅनर दोन मुलांचे वडील आहेत. त्यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून राजकीय दबाव तयार झालाय. त्यांचा स्वतःचा पक्ष राष्ट्रीय एकता पक्षाने (UBP) देखील सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतलाय. त्यानंतरही सॅनर पदावर कायम होते. मात्र, आता त्यांनी बहुमत नसल्यानं आणि सरकार स्थिर नसल्यानं राजीनामा दिलाय. लवकरच निवडणुका होऊन राजकारणात परतण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

कथित व्हिडीओत नेमकं काय?

मंगळवारी (१९ ऑक्टोबर) समोर आलेल्या व्हिडीओमुळे इर्सन सॅनर यांच्या प्रतिमेला मोठा झटका बसलाय. या व्हिडीओत सॅनर यांच्यासमोर एक २० वर्षीय मुलगी गाण्याच्या लयावर आपल्या शरीरावरील कपडे काढून नग्नावस्थेत येताना दिसत आहे. यावेळी पंतप्रधान इर्सन सॅनर कथितपणे हस्तमैथून करताना दिसत आहेत. मात्र, सॅनर यांनी हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा केलाय.

व्हिडीओवर इर्सन सॅनर यांचं म्हणणं काय?

या व्हिडीओवर आपली बाजू मांडताना सॅनर म्हणाले, “हा व्हिडीओ माझा नाही. कुणीतरी माझ्या प्रिय देशाची आणि पक्षाची सेवा करण्यापासून रोखत आहे. मात्र, ते असं राजकीय मार्गाने नाही, तर सार्वजनिक हल्ल्यांच्या माध्यमातून करत आहेत. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका षडयंत्राचा भाग म्हणून हा व्हिडीओ प्रसारित केला जातोय.”

हेही वाचा : विषारी सापाने शिपिंग कंटेनरमध्ये बसून केला भारत ते इंग्लंडपर्यंतचा प्रवास

तुर्कीच्या गुंडांवर आरोप करताना सॅनर म्हणाले की, हा हल्ला केवळ माझ्यावर नाही तर माझं कुटुंब, पक्ष आणि एकूणच राजकीय संस्थांवरील हल्ला आहे. त्यामुळे मी माझ्या राजकीय सल्लागारांसोबत चर्चा करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Northern cyprus pm ersan saner resign after leak of sex act video pbs

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या